दवबिंदू आणि निसर्गचित्र
चित्र-दवबिंदू आणि निसर्गचित्र
मोक्षदा नूलकर
पानावरती दवबिंदू चे कोंदण हे कोणी शिंपले
अलगद धरणी मातेने
प्रेमाने ते झेलले
अलगद धरणी मातेने
प्रेमाने ते झेलले
सौ.चंदना कैलास उतेकर
झिरपले असते अस्तित्व
काळ्या आईच्या कुशीत
विसावलो होऊन जलबिंदू
अलवार हरित पर्णराशीत
काळ्या आईच्या कुशीत
विसावलो होऊन जलबिंदू
अलवार हरित पर्णराशीत
सविता करंजकर
पहाट समयी सखे साजणी
दवबिंदूंचा सडा अंगणी..
जणू गळाली आकाशातून
अलगद एक टपोरी चांदणी..
दवबिंदूंचा सडा अंगणी..
जणू गळाली आकाशातून
अलगद एक टपोरी चांदणी..
क्षणभंगुर जरी आयुष्य दिधले
रुप देखणे किती लाभले..
त्यातच त्या दिनकराने
त्या मोत्याला दर्पण केले...
रुप देखणे किती लाभले..
त्यातच त्या दिनकराने
त्या मोत्याला दर्पण केले...
अंजली जोशी
रूपं तुझे आरस्पानी
वर्ख चंदेरी रेखे रवी
मातीमध्ये मिटण्या आधी
जगशी घटिका सौंदर्यांची
वर्ख चंदेरी रेखे रवी
मातीमध्ये मिटण्या आधी
जगशी घटिका सौंदर्यांची
दीपा ठाणेकर
मातीच्या गर्भामध्ये कोरडा उन्हाळा,
ढेकळा ढेकळामध्ये पडती
शुष्ककळा,
पर्ण हिरवे ,सुके ओलेत्या गारव्याचे,
देती संजीवन झेलूनी थेंब
अळवाचे,
ढेकळा ढेकळामध्ये पडती
शुष्ककळा,
पर्ण हिरवे ,सुके ओलेत्या गारव्याचे,
देती संजीवन झेलूनी थेंब
अळवाचे,
(शुष्ककळा नवीन शब्द तयार झाला असावा - काव्यतून , साहित्यातून काही नवीन शब्दाची भर घातली जात असते... जसे पुष्कळा वगैरे...)
अनिता लुगडे
गवताचे पाते
त्याचे दवबिंदूशी नाते
धरतीचा अंकूर जणू
आकाशाला भेटे
त्याचे दवबिंदूशी नाते
धरतीचा अंकूर जणू
आकाशाला भेटे
वृषाली गोखले
काळी आई आसुसली,
नवनिर्मितीचा ध्यास लागला!
एकेक थेंब तो दवाचा,हिरवाईने सजला,फुलला!
नवजीवन ते पाचट पिवळे,खत हो नव्या पिकाचे!
शेतामधले कण,कण होती,मोती भविष्याचे!
नवनिर्मितीचा ध्यास लागला!
एकेक थेंब तो दवाचा,हिरवाईने सजला,फुलला!
नवजीवन ते पाचट पिवळे,खत हो नव्या पिकाचे!
शेतामधले कण,कण होती,मोती भविष्याचे!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment