Posts

फुलपाखरू

Image
स्मिता परदेशी. रंगांचे ते मोहक ठिपके निळे जांभळे काळे पिवळे इवली इवली नाजूक फडफड इवल्या पंखांची ती धडपड        रंग गंध अन् सौंदर्याची        किती जाण नि कशी प्रेरणा         अंतराचीही ना तमा जीवाला         ओढ ही जणू कवी मनाला इवलेसे हे फुलपाखरू  दाद देतसे सौंदर्याला शीक मानवा हळवी मखमल ओरबाडूनी का करीसी तू  भवितव्याची नाहक कत्तल. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾               शैलजा     मानवाने घ्यावे शिक्षण  असे आमुचे जीवन आहे सबुरी धरल्यानंतर खरे जगणे सुंदर घडत आहे हेच सांगती फूलपाखरे भिरभिर भिरभिर उडताना अंधाराच्या कोशामधुनी हळूच बाहेर पडताना कोशामधली सबुरी आम्ही घट्ट साधली मनात म्हणुनच पंख लेऊन सुंदर मान मिळवला जनात अशीच सबुरी धरा तुम्हीही सुंदरतेचा मिळेल मान धीरापोटी फळे गोमटी अनुभव हाच येईल छान #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

मातीतील पान

Image
शैलजा माती, पाणी, आणि उजेड  मिळता अंकूर वाढू लागतो फळे, फुले अन् पाने देण्या देह तयाचा नित्य जागतो   रानामधला कोंब एकला एकांताला भीत नसे वाढत राहणे काम तयाचे हीच तयाची रित असे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ कल्पना देशमुख  नभी लपलेल्या चांदणीला रवि खुणावतो  जरा उजळल्या बघ,दशदिशा आवर तूझा पसारा.. सांजवेळी अस्ताला जातांना होऊ दे तूझे आगमन क्षणिक भेट जरी आपली देईन तूजला आलिंगन. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   वैशाली राणे  पानं मातीत मिसळते, बीज अंकुरता जणू पुन्हा जन्म घेते.. आयुष्य अवघे खेळ नियतीचा, उत्पत्ती स्थिती लय, नियम निसर्गाचा.. जीवनाचे असे पूर्ण होता आवर्तन, नवचैतन्याचे जणू हे परिवर्तन.. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी इवलासा कोंब तो उठे तरारून पाहे जगाकडे पान उंचावून  होई शहाणा तो जगा न्याहाळून आजूबाजू पाहे गेली पाने ती वाळून शहारतो जीव ऊन पावसाची भीती  धीर देत भिजविते खाली काळीशार माती जरा मरण ही असे कालचक्राचीच गती इवलासा जीव तो पहा शिकवितो नीती  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   कल्पना देशमुख   अष्टाक्षरी रचना सुकलेली पानगळ व...

शब्द- अबोला

शब्द- अबोला चंदा वाडकर बोल ना माझ्या प्रीत फुला का मनी धरतोस अबोला? काय गुन्हा झाला माझा पुढ्यात येऊन सांग मजला ! तुज ठाऊक आहे ना तुजविन मी नाही कोणी!  सख्या का छळतोस मला? अबोला  सोड या कातर क्षणी! तुजशिवाय मज काही सुचेना नयनातील अश्रू बघ सुकलेना! काळीज तीळ तीळ तुटलेना सख्या आता तरी माझ्याशी बोलना! पुरे झाले तुझे बहाणे  तुझ्या चरणी ह्र्दय ठेविलें! तुझ्याविना सख्या जगू कशी?  प्रेमाची बोलणी कर ना माझ्याशी !  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी शब्दांची केली उधळण पण भाव अबोलच राहिला ओठांनी वदले काही डोळ्यात अर्थ ना पाहिला तार मनीची जुळता शब्दांना नुरतो अर्थ  तव प्रेमाचा एक कटाक्ष  जगणे करीतसे सार्थ तू नकोच बोलू काही लटकाच तुझा हा रूसवा जाणते परी हिरमुसते पाहून अबोला फसवा.. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   कल्पना देशमुख दिनरात तूझा चेहरा स्वप्नात नित्य येतो अबोल या प्रीतीला सप्तसुरांनी छेडतो ।। प्रेमाची आर्त साद तू,एकदा तरी ऐकना आता पुरे हा अबोला शब्द ओठातील भावना ।। नकोच मुळी अबोला घुसमटणारे ते द्विधा मन ओसंडून वाहू दे प्रीतझरे व्हावे दोन जीवांचे मिलन ।। आतुरल...

शब्द- धुंद हवा

शब्द- धुंद हवा  कल्पना देशमुख  (अष्टाक्षरी रचना) सांजवेळी साद घाले मनातील भाव फुले धुंद हवेतील  गंध पाहुनिया तन झुले ।। धुंद हवा स्पर्शुनिया मम काया शहारली हुरहूर वाटे जीवा लाजुनिया बावरली ।। निशाराणी खुणावते गाते प्रीतीचा मारवा मिट्ट काळोखात सखी लपे मिठीत चांदवा ।। धुंद हवा चहूकडे धुके दाटले क्षणात भाव नाचरे बिलोरे ओढ बेबंद श्वासात ।। ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी  अष्टाक्षरी रचना धुंद गंध हा सुगंध  दरवळे आसमंत भान हरपूनि सख्या  भरून घे हवा धुंद  वारा मंद तारे मंद भोवताल धुंदफुंद सोबतीने प्रियतमा निसर्गही अनिर्बंध ग्रीष्म आणतो वसंत स्पर्श होता मृदू संथ भाव दाटतो मनात जणू पसरे मृद्गंध.  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾     चंदा वाडकर धुंद हवा जीव फुले दारी पारिजात डोले गंध चहू दरवळे मन सुगंधी जाहले        गारवा झुळूक गडे प्रीतीला उधाण आले रोमांच अंगी फुलले प्रणया आतुर झाले सजूनी मग बैसले ओठ मिटूनी घेतले स्वप्न अधुरे प्रीतीचे एका क्षणात भंगले ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर  धुंद हवा गुंग मती मंद गती येत सखी छुमछुम...

शब्द- क्षण

शब्द- क्षण अस्मिता भस्मे  कातरवेळी नकळत एक क्षण वेचूनी आला भूतकाळतील ते सोनेरी क्षण हरवून गेले त्यामधे हे वैरी मन भाबडी आशा फिरूनी येतील का हो तो क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾                       . चंदना उतेकर  आळवावरचा प्रत्येक थेंब मनभरून जगायला शिकवतो. क्षणभंगूर असला तरी  हिऱ्या प्रमाणे चमकायला शिकवतो. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  अखंड,अविरत कलचक्राचा तुकडा  एक क्षण  कधी सौख्य  तर कधी  दाह देई तो क्षण सदाच आठवून फक्त सुखद ते क्षण करू सोनेरी  भविष्यातील सर्वच क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा दीक्षित जन्म-मरण यातील अंतर राखुन ठेवतो एकच क्षण  कधी हसवतो कधी फसवतो कधी तारतो एकच क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ सुनंदा  आला क्षण गेला क्षण  असे का म्हणता फुका क्षणभंगूर  जीवनाचा  आस्वाद  मनसोक्त  लुटा ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ ऋतुजा गवस  जीवन आहे क्षणभंगुर त्याला बनवा सुमधुर क्षण अन क्षण निसटतोय हृदय पटलावर सामावतोय ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्वाती वामन एक दिवस जीवन असणारे फूल क्षणभर का होईना आसमंत सु...

शब्द- गंध मातीचा

शब्द- गंध मातीचा शैलजा पहिला रिमझिम पाऊस येता गंध मातीचा दरवळतो मेघांचा धरणीशी बघ ना कोमलसा धागा जुळतो ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर गंध मातीचा धुंद असा हा  बहर जणू अपुल्या प्रीतिचा मस्त असा हा दरवळे दाही दिशा आसमंती जणु दरवळे धुंद नशा ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर गंध मातीचा धुंद असा हा  बहर जणू अपुल्या प्रीतिचा मस्त असा हा दरवळे दाही दिशा आसमंती जणु दरवळे धुंद नशा  गंध मातीचा जाणवे जेव्हा काळजी घे जन्म पुन्हा पुन्हा पावसाच्या तुफान हाती  न लागो कधी माझा तान्हा ! ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾        चंदा वाडेकर गंध मातीचा  मन मोहरून गेला तुझ्या माझ्या प्रीतीचा बहर फुलला  तुझ्यासवे जगण्याचा अर्थ समजला. गंध मातीचा कायम ह्रदयात दाटला ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा अत्तराच्या दुकानात शोधले फार सुगंध भरेना कोणताच मनी बाहेरून आला गंध मातीचा असे अस्सल अत्तर बनवले कुणी? ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  सृजनाचा हुंकार असतो मातीचा गंध, किमती अत्तरहून ही मोहरवतो अंग, तप्त उन्हाचा जेव्हा सोसते धरणी संग, नवनिर्मितीची चाहूल उधळतो  पहिल्या शिडकाव्या संग. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अस्मिता ...

शब्द - स्वातंत्र्य

शब्द:- स्वातंत्र्य शैलजा-  कपडालत्ता, खाणे-पिणे,  लग्झरियस मिळावे एवढेच नसते स्वातंत्र्य  मानवास हे कळावे मनास मने जुळती जेथे स्वातंत्र्य हे मिळावे भलेच व्हावे प्रत्येकाचे अंतःकरणा कळावे स्वातंत्र्याच्या गुलामगिरीत तरुणाई गुरफटते आहे अन् चंगळवादी विचारांचा रस्ता धरते आहे. स्व - तंत्रात मग्न सारे यंत्रवत होत चाललेत आणि यंत्रांनाच माणसे बनवण्याचा अट्टाहास करत करते आहे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ रश्मी देसाई   राग-द्वेश, अन् दंभ-मत्सर, सारे काही गळावे जे जे सुंदर, उदात्त, तेते मानवजन्मा मिळावे गलिच्छ, वाईट विचार यात, मन कधी न चळावे यावद्चंद्र, सूर्य, तावत्, स्वातंत्र्य ना ढळावे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ मीनाक्षी तावरे  स्वातंत्र्याच्या सुगंधाने देश आहे दरवळला आठव थोर शहीदांचा झेंड्याने हो जागविला ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी विचारांच्या स्वातंत्र्याने,  नष्ट झाली गुलामगिरी,  मनातील भावनांच्या स्वातंत्र्याने,  विश्वच माझे घर झाले.  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  'स्व'ला उन्नत करणे हा तर अर्थ स्वातंत्र्याचा  स्वैराचारे न वर्तता  मेळ 'वि'चार  'वे'ळ 'क...