फुलपाखरू


स्मिता परदेशी.

रंगांचे ते मोहक ठिपके
निळे जांभळे काळे पिवळे
इवली इवली नाजूक फडफड
इवल्या पंखांची ती धडपड
       रंग गंध अन् सौंदर्याची
       किती जाण नि कशी प्रेरणा 
       अंतराचीही ना तमा जीवाला
        ओढ ही जणू कवी मनाला
इवलेसे हे फुलपाखरू 
दाद देतसे सौंदर्याला
शीक मानवा हळवी मखमल
ओरबाडूनी का करीसी तू 
भवितव्याची नाहक कत्तल.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾       
      
शैलजा    

मानवाने घ्यावे शिक्षण 
असे आमुचे जीवन आहे
सबुरी धरल्यानंतर खरे
जगणे सुंदर घडत आहे

हेच सांगती फूलपाखरे
भिरभिर भिरभिर उडताना
अंधाराच्या कोशामधुनी
हळूच बाहेर पडताना

कोशामधली सबुरी आम्ही
घट्ट साधली मनात
म्हणुनच पंख लेऊन सुंदर
मान मिळवला जनात

अशीच सबुरी धरा तुम्हीही
सुंदरतेचा मिळेल मान
धीरापोटी फळे गोमटी
अनुभव हाच येईल छान

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र