Posts

Showing posts from January, 2019

फुगे

Image
 एक हिरवा फुगा..... जो घेतल्याने होई तुमचे मन हिरवे.... जो विकल्याने होई  माझे जीवन हिरवे.... डॉ.अस्मिता भस्मे  फुगे फुगे ऐकताच मन फुग्याला पाहि आनंदाला पारावार न राहि फुगेवालीस पहाता वाटे सर्वे फुगे तिच्याकडील घ्यावे तिच्या ओंजळीत पैसे भरावे तिच्या डोळ्यात चमक पहावी तिच्या घरी हिरवळ पसरावी तिच्या आसपास शिक्षणाची ज्योत सतत तेवत रहावी वंदना नागरगोजे धन्यवाद!! #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

कुदळ, फावडे,लहान मुल

Image
बालमजुरी कोण्या दारी प्रकाशाचे लख्ख लख्ख लेणे.. कोठे घुमते आजही कातर जीवनगीत विराणे.. कोठे उतरी तारामंडळ कंदिल आणि पणत्या कोठे अंगण शोधती नजरा ठाव न लागे पण त्या.. नवीन कपड्यांच्या वासाने कुणी सुखावे मन्मनी फराळ आणिक फुटे फटाका कुठे पहाटगाणी... झोपडीतही तमास पळवे लुकलूकणारा दिवा नसेल ऐपत तरीही वाटे दिवाळसण हवा... चैतन्याचे भिरभिरती वारे उत्साहाचा झरा... नव्यानव्या नवलाईचा हा सण असे साजरा.. हौसेमौजेला गोंजारावे खर्च करावा पैसा मनामनांना जोडून घ्यावे सांगे सण हा ऐसा.. याच क्षणांना जगताना जळमटे मनाचीही काढू आपल्या वाट्याची आनंदी ओंजळ झोळीत त्यांच्याही वाढू... भेद न कुठले,कुठले ना किल्मिष सांगे दिवाळसण येणारा एक दिवा तेऊदे दारी लोकभान जपणारा... शुभांगी कदम 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 सुरक्षा राष्ट्राची..संपत्ती सर्वांची! श्रमप्रतिष्ठा की मजा? गावप्रतिष्ठा की सजा? वेठीस का धरावे बाल्यास? का हे नं कळे मोठ्यास? जरी हौसेने धरिली अवजारे हातांत, परि शक्ती नसे ती शरीरात! बालकास ते सांभाळावे, मजेत त्यांना ठेवावे! भाव~जीव तो त्यांचा आणिक, जीवन त्यांचे...