कुदळ, फावडे,लहान मुल
बालमजुरी
कोण्या दारी प्रकाशाचे
लख्ख लख्ख लेणे..
कोठे घुमते आजही कातर
जीवनगीत विराणे..
कोठे उतरी तारामंडळ
कंदिल आणि पणत्या
कोठे अंगण शोधती नजरा
ठाव न लागे पण त्या..
नवीन कपड्यांच्या वासाने
कुणी सुखावे मन्मनी
फराळ आणिक फुटे फटाका
कुठे पहाटगाणी...
झोपडीतही तमास पळवे
लुकलूकणारा दिवा
नसेल ऐपत तरीही वाटे
दिवाळसण हवा...
चैतन्याचे भिरभिरती वारे
उत्साहाचा झरा...
नव्यानव्या नवलाईचा हा
सण असे साजरा..
हौसेमौजेला गोंजारावे
खर्च करावा पैसा
मनामनांना जोडून घ्यावे
सांगे सण हा ऐसा..
याच क्षणांना जगताना
जळमटे मनाचीही काढू
आपल्या वाट्याची आनंदी ओंजळ
झोळीत त्यांच्याही वाढू...
भेद न कुठले,कुठले ना किल्मिष
सांगे दिवाळसण येणारा
एक दिवा तेऊदे दारी
लोकभान जपणारा...
शुभांगी कदम
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सुरक्षा राष्ट्राची..संपत्ती सर्वांची!
श्रमप्रतिष्ठा की मजा?
गावप्रतिष्ठा की सजा?
गावप्रतिष्ठा की सजा?
वेठीस का धरावे बाल्यास?
का हे नं कळे मोठ्यास?
का हे नं कळे मोठ्यास?
जरी हौसेने धरिली अवजारे हातांत,
परि शक्ती नसे ती शरीरात!
परि शक्ती नसे ती शरीरात!
बालकास ते सांभाळावे,
मजेत त्यांना ठेवावे!
भाव~जीव तो त्यांचा आणिक,
जीवन त्यांचे रक्षावे!
मजेत त्यांना ठेवावे!
भाव~जीव तो त्यांचा आणिक,
जीवन त्यांचे रक्षावे!
फुलवावे,टिकवावे ते बाल्य निरागस,
दक्ष रहावे सर्वांनीच हो,
रक्षावे ते गोंडस, लोभस!
दक्ष रहावे सर्वांनीच हो,
रक्षावे ते गोंडस, लोभस!
म्हणे, "मोठयाबरोबर आम्हीही काम करणार,"
आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार!
आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार!
तुम्हीच तर राष्ट्राचे दूत होणार!.राष्ट्र घडवणार...
©वृषाली गोखले
बाल्याच्या उंबरठ्यावरून
परतून गेले माझे बालपण...
पोटापाण्याच्या चिंतेने
ग्रासले पहा माझे मन...
परतून गेले माझे बालपण...
पोटापाण्याच्या चिंतेने
ग्रासले पहा माझे मन...
सविता कारंजकर
श्रमांचं मोल जो अजाणतेपणी जाणेल
त्याला लाभेलच आरोग्य...
शरीराचं आणि मनाचंही
भिरभिरत्या मनाला साथ लाभेल कष्टाची
तर निश्चिती होईल भावी कलाकृतीची..
ज्ञान अन् मनोरंजनाचे overdose देणार्या मोबाईलपेक्षा
घाम अन् श्रमाला प्रतिष्ठा देणारी साधनं बालपणीच जोपासूया
भावी विश्वकर्म्याना वंदन आपण करूया.
सौ स्मिता परदेशी.
त्याला लाभेलच आरोग्य...
शरीराचं आणि मनाचंही
भिरभिरत्या मनाला साथ लाभेल कष्टाची
तर निश्चिती होईल भावी कलाकृतीची..
ज्ञान अन् मनोरंजनाचे overdose देणार्या मोबाईलपेक्षा
घाम अन् श्रमाला प्रतिष्ठा देणारी साधनं बालपणीच जोपासूया
भावी विश्वकर्म्याना वंदन आपण करूया.
सौ स्मिता परदेशी.
छोट्या चिमुकल्यांना पहाताच
मन कळवळून येई
ज्यांच्या हाती लेखणी हवी
त्यांच्या हाती कुदळ,फावडी
खेळण्याच्या वयात
काम करण्याची तयारी
हि चिमुकल्येच खरी
देशाची संपत्ती
नवनिर्मिती करती
मन कळवळून येई
ज्यांच्या हाती लेखणी हवी
त्यांच्या हाती कुदळ,फावडी
खेळण्याच्या वयात
काम करण्याची तयारी
हि चिमुकल्येच खरी
देशाची संपत्ती
नवनिर्मिती करती
वंदना नागरगोजे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment