Posts

Showing posts from March, 2020

फुलपाखरू

Image
स्मिता परदेशी. रंगांचे ते मोहक ठिपके निळे जांभळे काळे पिवळे इवली इवली नाजूक फडफड इवल्या पंखांची ती धडपड        रंग गंध अन् सौंदर्याची        किती जाण नि कशी प्रेरणा         अंतराचीही ना तमा जीवाला         ओढ ही जणू कवी मनाला इवलेसे हे फुलपाखरू  दाद देतसे सौंदर्याला शीक मानवा हळवी मखमल ओरबाडूनी का करीसी तू  भवितव्याची नाहक कत्तल. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾               शैलजा     मानवाने घ्यावे शिक्षण  असे आमुचे जीवन आहे सबुरी धरल्यानंतर खरे जगणे सुंदर घडत आहे हेच सांगती फूलपाखरे भिरभिर भिरभिर उडताना अंधाराच्या कोशामधुनी हळूच बाहेर पडताना कोशामधली सबुरी आम्ही घट्ट साधली मनात म्हणुनच पंख लेऊन सुंदर मान मिळवला जनात अशीच सबुरी धरा तुम्हीही सुंदरतेचा मिळेल मान धीरापोटी फळे गोमटी अनुभव हाच येईल छान #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

मातीतील पान

Image
शैलजा माती, पाणी, आणि उजेड  मिळता अंकूर वाढू लागतो फळे, फुले अन् पाने देण्या देह तयाचा नित्य जागतो   रानामधला कोंब एकला एकांताला भीत नसे वाढत राहणे काम तयाचे हीच तयाची रित असे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ कल्पना देशमुख  नभी लपलेल्या चांदणीला रवि खुणावतो  जरा उजळल्या बघ,दशदिशा आवर तूझा पसारा.. सांजवेळी अस्ताला जातांना होऊ दे तूझे आगमन क्षणिक भेट जरी आपली देईन तूजला आलिंगन. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   वैशाली राणे  पानं मातीत मिसळते, बीज अंकुरता जणू पुन्हा जन्म घेते.. आयुष्य अवघे खेळ नियतीचा, उत्पत्ती स्थिती लय, नियम निसर्गाचा.. जीवनाचे असे पूर्ण होता आवर्तन, नवचैतन्याचे जणू हे परिवर्तन.. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी इवलासा कोंब तो उठे तरारून पाहे जगाकडे पान उंचावून  होई शहाणा तो जगा न्याहाळून आजूबाजू पाहे गेली पाने ती वाळून शहारतो जीव ऊन पावसाची भीती  धीर देत भिजविते खाली काळीशार माती जरा मरण ही असे कालचक्राचीच गती इवलासा जीव तो पहा शिकवितो नीती  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   कल्पना देशमुख   अष्टाक्षरी रचना सुकलेली पानगळ व...

शब्द- अबोला

शब्द- अबोला चंदा वाडकर बोल ना माझ्या प्रीत फुला का मनी धरतोस अबोला? काय गुन्हा झाला माझा पुढ्यात येऊन सांग मजला ! तुज ठाऊक आहे ना तुजविन मी नाही कोणी!  सख्या का छळतोस मला? अबोला  सोड या कातर क्षणी! तुजशिवाय मज काही सुचेना नयनातील अश्रू बघ सुकलेना! काळीज तीळ तीळ तुटलेना सख्या आता तरी माझ्याशी बोलना! पुरे झाले तुझे बहाणे  तुझ्या चरणी ह्र्दय ठेविलें! तुझ्याविना सख्या जगू कशी?  प्रेमाची बोलणी कर ना माझ्याशी !  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी शब्दांची केली उधळण पण भाव अबोलच राहिला ओठांनी वदले काही डोळ्यात अर्थ ना पाहिला तार मनीची जुळता शब्दांना नुरतो अर्थ  तव प्रेमाचा एक कटाक्ष  जगणे करीतसे सार्थ तू नकोच बोलू काही लटकाच तुझा हा रूसवा जाणते परी हिरमुसते पाहून अबोला फसवा.. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   कल्पना देशमुख दिनरात तूझा चेहरा स्वप्नात नित्य येतो अबोल या प्रीतीला सप्तसुरांनी छेडतो ।। प्रेमाची आर्त साद तू,एकदा तरी ऐकना आता पुरे हा अबोला शब्द ओठातील भावना ।। नकोच मुळी अबोला घुसमटणारे ते द्विधा मन ओसंडून वाहू दे प्रीतझरे व्हावे दोन जीवांचे मिलन ।। आतुरल...

शब्द- धुंद हवा

शब्द- धुंद हवा  कल्पना देशमुख  (अष्टाक्षरी रचना) सांजवेळी साद घाले मनातील भाव फुले धुंद हवेतील  गंध पाहुनिया तन झुले ।। धुंद हवा स्पर्शुनिया मम काया शहारली हुरहूर वाटे जीवा लाजुनिया बावरली ।। निशाराणी खुणावते गाते प्रीतीचा मारवा मिट्ट काळोखात सखी लपे मिठीत चांदवा ।। धुंद हवा चहूकडे धुके दाटले क्षणात भाव नाचरे बिलोरे ओढ बेबंद श्वासात ।। ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी  अष्टाक्षरी रचना धुंद गंध हा सुगंध  दरवळे आसमंत भान हरपूनि सख्या  भरून घे हवा धुंद  वारा मंद तारे मंद भोवताल धुंदफुंद सोबतीने प्रियतमा निसर्गही अनिर्बंध ग्रीष्म आणतो वसंत स्पर्श होता मृदू संथ भाव दाटतो मनात जणू पसरे मृद्गंध.  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾     चंदा वाडकर धुंद हवा जीव फुले दारी पारिजात डोले गंध चहू दरवळे मन सुगंधी जाहले        गारवा झुळूक गडे प्रीतीला उधाण आले रोमांच अंगी फुलले प्रणया आतुर झाले सजूनी मग बैसले ओठ मिटूनी घेतले स्वप्न अधुरे प्रीतीचे एका क्षणात भंगले ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर  धुंद हवा गुंग मती मंद गती येत सखी छुमछुम...

शब्द- क्षण

शब्द- क्षण अस्मिता भस्मे  कातरवेळी नकळत एक क्षण वेचूनी आला भूतकाळतील ते सोनेरी क्षण हरवून गेले त्यामधे हे वैरी मन भाबडी आशा फिरूनी येतील का हो तो क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾                       . चंदना उतेकर  आळवावरचा प्रत्येक थेंब मनभरून जगायला शिकवतो. क्षणभंगूर असला तरी  हिऱ्या प्रमाणे चमकायला शिकवतो. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  अखंड,अविरत कलचक्राचा तुकडा  एक क्षण  कधी सौख्य  तर कधी  दाह देई तो क्षण सदाच आठवून फक्त सुखद ते क्षण करू सोनेरी  भविष्यातील सर्वच क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा दीक्षित जन्म-मरण यातील अंतर राखुन ठेवतो एकच क्षण  कधी हसवतो कधी फसवतो कधी तारतो एकच क्षण ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ सुनंदा  आला क्षण गेला क्षण  असे का म्हणता फुका क्षणभंगूर  जीवनाचा  आस्वाद  मनसोक्त  लुटा ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ ऋतुजा गवस  जीवन आहे क्षणभंगुर त्याला बनवा सुमधुर क्षण अन क्षण निसटतोय हृदय पटलावर सामावतोय ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्वाती वामन एक दिवस जीवन असणारे फूल क्षणभर का होईना आसमंत सु...

शब्द- गंध मातीचा

शब्द- गंध मातीचा शैलजा पहिला रिमझिम पाऊस येता गंध मातीचा दरवळतो मेघांचा धरणीशी बघ ना कोमलसा धागा जुळतो ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर गंध मातीचा धुंद असा हा  बहर जणू अपुल्या प्रीतिचा मस्त असा हा दरवळे दाही दिशा आसमंती जणु दरवळे धुंद नशा ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ नीता धोडपकर गंध मातीचा धुंद असा हा  बहर जणू अपुल्या प्रीतिचा मस्त असा हा दरवळे दाही दिशा आसमंती जणु दरवळे धुंद नशा  गंध मातीचा जाणवे जेव्हा काळजी घे जन्म पुन्हा पुन्हा पावसाच्या तुफान हाती  न लागो कधी माझा तान्हा ! ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾        चंदा वाडेकर गंध मातीचा  मन मोहरून गेला तुझ्या माझ्या प्रीतीचा बहर फुलला  तुझ्यासवे जगण्याचा अर्थ समजला. गंध मातीचा कायम ह्रदयात दाटला ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा अत्तराच्या दुकानात शोधले फार सुगंध भरेना कोणताच मनी बाहेरून आला गंध मातीचा असे अस्सल अत्तर बनवले कुणी? ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  सृजनाचा हुंकार असतो मातीचा गंध, किमती अत्तरहून ही मोहरवतो अंग, तप्त उन्हाचा जेव्हा सोसते धरणी संग, नवनिर्मितीची चाहूल उधळतो  पहिल्या शिडकाव्या संग. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अस्मिता ...

शब्द - स्वातंत्र्य

शब्द:- स्वातंत्र्य शैलजा-  कपडालत्ता, खाणे-पिणे,  लग्झरियस मिळावे एवढेच नसते स्वातंत्र्य  मानवास हे कळावे मनास मने जुळती जेथे स्वातंत्र्य हे मिळावे भलेच व्हावे प्रत्येकाचे अंतःकरणा कळावे स्वातंत्र्याच्या गुलामगिरीत तरुणाई गुरफटते आहे अन् चंगळवादी विचारांचा रस्ता धरते आहे. स्व - तंत्रात मग्न सारे यंत्रवत होत चाललेत आणि यंत्रांनाच माणसे बनवण्याचा अट्टाहास करत करते आहे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ रश्मी देसाई   राग-द्वेश, अन् दंभ-मत्सर, सारे काही गळावे जे जे सुंदर, उदात्त, तेते मानवजन्मा मिळावे गलिच्छ, वाईट विचार यात, मन कधी न चळावे यावद्चंद्र, सूर्य, तावत्, स्वातंत्र्य ना ढळावे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ मीनाक्षी तावरे  स्वातंत्र्याच्या सुगंधाने देश आहे दरवळला आठव थोर शहीदांचा झेंड्याने हो जागविला ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी विचारांच्या स्वातंत्र्याने,  नष्ट झाली गुलामगिरी,  मनातील भावनांच्या स्वातंत्र्याने,  विश्वच माझे घर झाले.  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  'स्व'ला उन्नत करणे हा तर अर्थ स्वातंत्र्याचा  स्वैराचारे न वर्तता  मेळ 'वि'चार  'वे'ळ 'क...

दीपमाळ

Image
  वृषाली गोखले राऊळी कला अवतरली दीपमाळ ती झगमगली कैक वर्षांची दीपावली मंदिराची श्रीमंती वाढली ती चैतन्याने निनादली शाश्वत ओजे स्थिरावली नभात शक्ती एकवटली विश्वशक्ती अवतरली मंदिरे उदंड दुमदुमली ती प्रांगणे तेजाळली भक्तांची मने आसुसली देवनगरी आनंदली दीपमाळ सज्ज झाली भक्तांची जमे मांदियाळी ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ स्मिता परदेशी उंच नभांतरी दीपमाळ ही उजळण्या अष्टदिशा खरी तेजोमय तो प्रकाश उधळीत  आत्मोन्नत्तीचा मार्ग अंतरी ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   वंदना नागरगोचे   किती सुंदर ग माझी दिपमाळ तुला पहाताच पुनवेची याद येई पुनवेला दिव्यांची थोडी आरास होई अंबाईच्या त्रिपुरी पुनवेला दिव्यांची रोषणाई होई भक्त जन हजेरी लावी दिपमाळ बघण्यासाठी, दर्शनासाठी ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अपर्णा आंबेकर   उंच भरारी गगनी घ्यावी तरी भुमिवर पद स्तब्ध असावी स्व :प्रकाशाने धरित्री उजळावी तरी माणुसकी ना कधी विसरावी  दिपस्तंभ शिकवणी घ्यावी जगण्यास नवी उमेद मिळावी जगदंबेच्या कृपाप्रसादाची वृष्टी जीवनात शत जन्म असावी क्षितिजापर्यंत दृष्टी जाता काही मजसी दिसले नाही  कवेत जीव माझा होता आनंदा...

चंद्र चांदणे

Image
वृषाली गोखले अनंताकडे प्रवास पूर्णत्वाची ओढ लागे जिवा! नश्वरतेच्या विळख्यातून वाचव रे दैवा! नभीचा तो अद्भुत नजारा पहातच रहावा! शांततेत आत्मा सृष्टीत विलीन व्हावा! ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अस्मिता भस्मे नाभोमंडपी पाहता या कांतीमय रजनीनाथास.... मोहरूनी गेले मन क्षणार्ध झाला तुझाच भास.... मोद भरूनी गेली मनी ही भूवरील लखलख दिव्यांची आरास.... ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾          अपर्णा आंबेकर चहुकडे मंद पसरला  तारांगण भारूनि राहिला काजव्या सम लकलकला हलकेच चंद्रमा दिसला झाकोळला  परी तिमीर हसला मानाने नभांगणी  प्रसवला रात्रीचा राजा चमकला गर्वाने गगनी परतुनी आला ना सूर्य ना धरित्री  ना मेघ ना सावित्री  दृढनिश्चय असे जेव्हा  यशवंत व्हाल तेव्हा ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   स्मिता परदेशी  प्रसन्न वदने शशि चालला  गुरूदक्षिणा अर्पण करण्या तेजःपुंज परि शीतल आभा दिमाखात ती नभा दाविण्या प्रदक्षिणा ती संपन्न करूनि गुरुकृपेचा प्रसाद लेवूनी पादाक्रांत जणू भूमातेचे कलेकलेने विश्व उजळण्या....      #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्र...

कोरडी विहिर

Image
  शुभांगी कदम   कोरड ठक्क रूप तुझं नक्कीच नव्हतं कधी कधी तुझ्या पोटात नांदायची इवलुशी नदी... कुठे गेले आता सारे स्वयंभू उमाळे कोरडेपणा तुझा आणि माझे मन जळे... आटलीस बाई तू की आटवले तुला बोर मारून टाक्यांमध्ये साठवलय तुला... कधी समृद्धीची फिरायची तुझ्यावर रहाटी... आता म्हणे शाप तुला तू गं वांझोटी... तुझ्या काठांवर कधी जीव तृप्त व्हायचे किलबिल फांद्यांवर आणि मुके जीव न्हायचे... आला गेला वाटसरू आशीर्वाद दयायचा उरभरून ओलावा तुझ्यातला प्यायचा... धुणी भांडी कधी कधी दुखणी गाऱ्हाणी आता उजाड सारं अन सोबत विराणी... डोळेभरुन माझे सखे तुझी वेणा सांग मला तू भरून वाहशील का पुन्हा? ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा विहिरीचं पाणी आहे आटलेलं  डोळ्यात पाणी आहे साठलेलं ढगातल्या देवा बरसुदे पाणी माझं शिवार आहे फाटलेलं विहीरीला फुटुदे खळखळता झरा मळा फुलुदे धान्याने सारा कृपा ईश्वरा अशी काही करा मायेची बरसात माझ्यावर धरा #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

कुलूप

Image
नीता धोडपटकर   बंधमुक्त मी , मज न ठावे  कधी कुठे ते रुजावे मिळता फुरसत, आणिक रुजवत ईशचरणी ते बहरावे ! ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा जन्माचे कारण शोधील कोण? देवाची करणी जाणील कोण? जुनाट कुलपात जन्मुन आला तरूस आता सांभाळील कोण? ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ चंदा वाडकर  बंद कुलुपात जिणें माझे बहरत आहे बियाणे मी रुजणे मज ठाऊक आहे प्रतिकूल परिस्थितीत बहरणे मज पसंत आहे  इवलेसे रोपटे जरी मज जगण्याची आस आहे. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अंजली जोशी  गंजलेल्या कुलुपावर इवलसं रोप तरारलं, रुजलं च ते जरा ओलावा मिळाल्यावर, ना चिंता ना भीती असे कदा अंकुरण्या वर हे च सांगे हा सळसळता कोवळा हिरवा बहर चैतन्या ची अशीच उधळण राहो या चराचरावर. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾   ऋतुजा गवस  बियाणे रुजावे जसे माळरानी खडकाळ तसे रोप उगवले गंजलेल्या कुलूपावर निसर्गाची करणी मानवाला अनाकलनीय तरी मौलिक संदेश प्रतिकूलतेतूनी बहरण्याचा करूनी संकटावर मात मी बहरणार,उभे राहणार.. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शुभांगी कदम   एकच ठावे मजला रुजणे आणिक झिजणे करू कशास विचार कशास म्हणती विझणे.. आधार असो मा...

मैत्री

शुभांगी कदम त्याच्या यादीत असो नसो तरी आपण मात्र सोबत जावं सुख दुःखाला पदोपदी त्याच्यासोबत वाटून घ्यावं अनाम नितळ तो समान धागा  बांधून घ्यावे हाती कंकण बनून सावली छत्र धरावे नको दुरावा एकही क्षण दोन शरीरे दैवी योजना अनुभूतीची एक भावना रक्त नाही,नाही नाते नाही कुठले स्वार्थी बंधन या हृदयीचे त्या हृदयी 'मैत्र जीवांचे' परिमल चंदन आयुष्यातला 'शून्य' सखा तू सोबत असता  मी भाव चढा कणखर पोलादी सतत सोबती  प्रेरक माझा तू सह्यकडे ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ सौ.ऋतुजा गवस(गीता) मैत्री असावी निखळ पारदर्शी त्यात नसावा कुठलाच स्वार्थ मैत्री ऋणानुबंधाची रेशीमगाठ रेशीमगाठीची विण विश्वासाची मैत्री श्रीकृष्ण सुदाम्यासारखी त्यात नसावा भेदाभेद ,मत्सर त्याग स्नेह सौहार्दभाव असावा निशब्द भावनांची उकल व्हावी मैत्रीत असावा सुखद विसावा  असावी उत्तम विचारांची जोड मैत्रीत दुनियादारी न येता असावी फक्त दिल दोस्ती यारी #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #माझीशाळामाझीभाषा #चित्रकविता

विठ्ठल

Image
शुभांगी कदम जो-तो शोधे विठ्ठल आपुला ठायी ठायी आहे त्याचा वास.. रोजचीच देवा आषाढी-कार्तिकी चराचरी सकळ माउली दिसे.. ज्याचा जैसा रंग त्याला तैसा संग रुपे मनोहर घेई ऐसे.. विठ्ठला तू पाणी सुखे गाई वाणी अवकाश व्यापे माय रुक्मिणी.. एक नादब्रह्म सदा येवो कानी अवघी पंढरी विठुमय.. ज्याला त्याला भेटो विठ्ठल मनीचा तगमग सारी विझूदेगा.. आगे विठाबाई माय रखुमायी दिसू देगा डोळा संसार सुखाचा. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ ऋतुजा गवस   विठ्ठल पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला | टाळ मृदुंगाला | आनंदला||१|| संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी | जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२|| एकोप्याची वारी| वारकरी दंग | भजनात गुंग | भक्तगण ||३|| शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी| घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४|| शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा | करण्यास सदा | उपकारी||५|| दर्शनाची आस | मन घाली साद| माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६|| जोडूनिया कर | हिच विनवणी | रहावी धरणी | आनंदीत ||७|| ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अस्मिता भस्मे ज्यांनी घेेतला माझा ध्यास ... मी आहे तयांच्या आसपास... ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾         ...

घरटे

Image
  नीता धोडपकर  माझे असे बांधिले  जमवुन काडी काडी जोडीदारही सोडून गेला अर्धी होता माडी आप्तजनांच्या साथीने मी वाढविले पिल्ला ,  झाला जरी उशीर सख्यांनो, धरु नका अबोला !  ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ शैलजा अरे माणसा घरटे माझे इकोफ्रेंडली आहे पाहा काड्या काड्या जोडुन केले सुबक छानसे अहा अहा तू रे माणसा करतोस काय? घातक जीवन जगतोस खूप घरकुल तुझे बांधण्यासाठी बुजवुन टाकतोस नद्या नि कूप तुझ्या अशा या जगण्याने पर्यावरणा धोका होई माझे घरटे खूपच छान फांदीवरती झोका घेई इकोफ्रेंडली माझे घरटे झुलत राहते दिवस-रात धोका नाही कुणास काही न्यारीच आहे याची बात जागा होरे तूही माणसा निसर्ग सारा जपून ठेव वाढवताना इमारती तू आमचे देखील भान ठेव नकोस तोडू वने जंगले घरकुल तुझे बांधताना कंठच दाटुन येतो माझा  तुला आज हे सांगताना ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ वंदना नागरगोचे खोप्या मधी खोपा ग सुगरणीचा खोपा ग बाभळीच्या झाडावर विण-विणते झरझर शोधती काड्या-कुडया जमविती संसाराला हळूहळू पिलासाठी बनविती कापसाची लादी ऊन-पाऊस लागु नये अखंड गवसत फिरती पावसाच्या आगुदर खोपा तयार करिती ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾...

धुके

Image
धुके स्मिता परदेशी तुझ्या बरसण्याच्या आसेने बघ डोळे सुद्धा तहानलेत आता नुसतेच निरोप काळेकभिन्न कधी येशील तू स्वतः? असमंतात अधीरता तुला झेलून घेण्याची लतावेलिंमध्ये चढाओढ मिठित तुझ्या येण्याची... तलावाचे गीत अधूरे तरंगांच्या नादाविना मृद्गन्ध ही शोधे इथे तुझ्या ओलेत्या खुणा.. वठलेल्या जीर्ण मनी हिरवे कंच धुमारे मन भरलेले तव कर रीते या माहेरी पुन्हा रे.. नवचैतन्याचा वसा तुझा का भिजूनही तू थिजलेला श्रृंगाराचा अंगार धरेचा तुझ्याविना विझलेला.. पूरे आता रुसवे फुगवे ये भेटू आवेगाने सृजनाचे मिलन होता बघ रुजेल हिरवे गाणे... शुभांगी कदम ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ अपर्णा आंबेकर एकच प्याला हाती आला कॉफ़ी वाफाळलेली ल्याला कडू चवीची बीन साखरेची पण सख्यांसवे अमृताचा प्याला मेघ गर्जण्यास तयार zaala वीज जोडीला लखलख न्यारा थेंब टपोरे चमकणारे मोत्यासही टक्कर देणारे अलगद आला  बरसला सावन समीर अधीर घाली आलिंगन रसरसलेल्या वृक्षान्वरती किलबिल पक्षी मधुर गाती धरित्री सुंदरतेने सजलेली हिरवी शाल पांघरलेली लाल पिवळ्या फुलांच्या माळा गळा तिचा दिसे साजिरा चहुकडे गर्द ...