शब्द - स्वातंत्र्य
शब्द:- स्वातंत्र्य
शैलजा-
कपडालत्ता, खाणे-पिणे,
लग्झरियस मिळावे
एवढेच नसते स्वातंत्र्य
मानवास हे कळावे
मनास मने जुळती जेथे
स्वातंत्र्य हे मिळावे
भलेच व्हावे प्रत्येकाचे
अंतःकरणा कळावे
स्वातंत्र्याच्या गुलामगिरीत तरुणाई गुरफटते आहे
अन् चंगळवादी विचारांचा रस्ता धरते आहे.
स्व - तंत्रात मग्न सारे यंत्रवत होत चाललेत
आणि यंत्रांनाच माणसे बनवण्याचा अट्टाहास करत करते आहे
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
रश्मी देसाई
राग-द्वेश, अन् दंभ-मत्सर, सारे काही गळावे
जे जे सुंदर, उदात्त, तेते मानवजन्मा मिळावे
गलिच्छ, वाईट विचार यात, मन कधी न चळावे
यावद्चंद्र, सूर्य, तावत्, स्वातंत्र्य ना ढळावे
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
मीनाक्षी तावरे
स्वातंत्र्याच्या सुगंधाने
देश आहे दरवळला
आठव थोर शहीदांचा
झेंड्याने हो जागविला
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्मिता परदेशी
विचारांच्या स्वातंत्र्याने,
नष्ट झाली गुलामगिरी,
मनातील भावनांच्या स्वातंत्र्याने,
विश्वच माझे घर झाले.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अंजली जोशी
'स्व'ला उन्नत करणे
हा तर अर्थ स्वातंत्र्याचा
स्वैराचारे न वर्तता
मेळ 'वि'चार 'वे'ळ 'क'र्तव्याचा.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अंजली जोशी.
स्वातंत्र्य मिळालं कष्टांनी झुगारून जुलमी वृत्ती,
राखण्यासाठी हवी स्वैराचार सोडून जबाबदारीची स्वीकृती,
दांभिकता,स्वार्थ ,अनिती
घालून येतात स्वातंत्र्याच्या झुली,
स्वातंत्र्याच्या पवित्र अस्तित्वाचाच मग चढतो बळी.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
साधना पोहरे
क्रांतिवीरांचे तन-मन अर्पण
थोरजीवांचे सुविचार धोरण ।
'एकीचे बळ' झाले कारण
स्वातंत्र्याचे बांधिले तोरण।।
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
दीपाली पडवळ
मला नाही अडकायचे
आता कशातही
कोणालाही स्पष्टीकरण का द्यायचं
अशा *स्वातंत्र्यातही*
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
चंदा वाडकर
गुलामगिरीच्या तोडून साखळ्या
स्वातंत्र्याचा ध्वज फडकला
देशाभिमान उरी दाटला
वंदन करूया मातृभूमीला
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दकविता
Comments
Post a Comment