Posts

Showing posts from March, 2019

निष्पर्ण झाड

Image
 चित्र-निष्पर्ण  झाड   प्रीती कामत तेलंग त्यजूनिया पर्णराशी, ना त्याची खंत उराशी फलद्रुप होता जन्म सार्थकी, उणे न काही मम भाग्यासी।  प्रो. भारती प्रभू पानगळच ती...          आशा निराशेच्या झोक्यासारखी                    कधी उधळुन संपलेली          कधी बहरण्या आसुसलेली.    अंजली जोशी निष्पर्ण देह जरी झाला कृतार्थ जन्म हा माझा जीव एकच जरी हा माझा शतबीज सृजने बरसला  वृषाली गोखले पानगळ होई,परि सुप्त बीजे, बदलला ऋतू फिरुनी वृक्ष सुपर्णे पुन्हा विराजे मोद बहरे,सृष्टीत बहरुनी  स्मिता परदेशी सृजनशील सख्या ..... त्यांच्या कल्पकतेचा दरवळ उत्साहाची बीजे स्फुरती नैराश्याची आपसुकच पानगळ            सविता करंजकर पर्णहीन तरी लक्ष करांनी तू देशी आम्हां फळे.. किमया  त्या निर...

गर्द जांभळं निसर्गचित्र

 चित्र-गर्द जांभळं  निसर्गचित्र   मोक्षदा नूलकर निळ्या भोर आकाशी उष: काली दिनकर  प्रगटला अवनी हि लाजली  क्षितीजावर लाली चढली बाभूळ हि निश्चल  उभा निसर्गाची किमया बघा  वृषाली गोखले भाव~भावना सांजवेळच्या  रंगछटा त्या नभातळीच्या  वृषाली गोखले संधिकाल हा भावुक झाला आभाळी तो अर्क शोभला  दीपा ठाणेकर कातरवेळी दाटल्या संध्याछाया, आकाशातून मनाशी  कुजबुणा-या , दिशादिशांतून आले  एकाकीपण,  शुक्राची परि एक  चांदणी,  लकालकत राही उभी एकटी,  मिटून घेता काजळ  निळे गहिरे,  तिचे अस्तित्व सदा  खुणावे.... #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #माझीशाळामाझीभाषा #चित्रकविता

मनालीतील रम्य पहाट

Image
करंकुशीत डोंगराच्या.. धूसर धुके दाटलेले.. कुपीत मनाच्या जणू गुपित साचलेले.. खडा पहारा करत झाड नियंत्याला वंदन करते... सविता करंजकर  ऋतूच्या कुशीत हरवेन मी.. माझी मला गवसेन मी सविता करंजकर  ते कोण दडले डोंगरापालिकडे, ओज~तेज दिनकराचे, प्रकाशले हिमकडे ते काव्य स्फुरले,प्रसन्न उषा दर्शनाने, पण हे तर स्वप्न सखी गं, आमंत्रिले यामिनीने वृषाली गोखले  गिरीच्या कुशीत धुके विसावले मन हरकून गेले गिरीच्या छायेत चित्त हरखून गेले, तरु हर्षुन डोले..... ऋतुजा गवस  वसंताचे आगमन.. कोकिळेचे गूंजन.. सख्यांनो करूया.. चंदनाला वंदन... सविता करंजकर  गिरिशिखरावरी भुरे धुके दाटले , मनी अनामिक काहुर माजले , भोवती निसर्गाचे रंग साजिरे , वसुंधरेने पर्जन्यास प्रीतीचे पत्र धाडले. दीपा ठाणेकर  धरणीमायेने उंच नभी कसे पसरले बाहू झरझर आभाळातून दाट धुके लागे वाहू सौ.चंदना उतेकर धन्यवाद!! #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

कुत्रा,शेत...पहुडलेले

Image
कुत्रा,शेत...पहुडलेले धन्याच्या शेताचे निष्ठेने रक्षण करावे काळ्या आईच्या कुशीत निद्रासुख घ्यावे.. घरदार सुरक्षित ठेवूनी ईमान राखतो प्रामाणिकपणे कर्म तूझे दिल्या भाकरीस जागतो.. हूंगणे हे दैवी देणे तूला लाभले चौर्यकर्म करणाऱ्यास तू तुरूंगात धाडले..।। सौ.कल्पना देशमुख  माझ्या इटुकल्या विश्वाचं वेटोळं इमाने इतबारे राखतो मी म्हणूनच काळया आईच्या कुशीत निर्धास्त डोळे झाकतो मी....      सौ स्मिता परदेशी. धन्यवाद! #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता ,

मेहंदी

Image
मेहंदी हातावरच्या मेहंदीने लाल भडक रंग घेतला की प्रेम खुलत म्हणतात... मी मात्र पाहिले त्याच लाल रंगात जळणारी 'ती'.. अविरत आणि अविश्रांत.. कधी प्रथा परंपरांच्या नावाखाली कधी प्रेमात आणि नात्यात बांधलेली प्रत्येकाला आपलं समजून झोकून देऊन केवळ आणि केवळ प्रेम उधळणारी... स्वतःला लागणाऱ्या झळांची कोणतीही खूण चेहऱ्यावर न दाखवता आयुष्यभर फक्त जळणारी 'ती'... नशिबाने कधी वणवा बनून तर कधी पणती बनून... पुन्हा पुन्हा भरत राहते आपले तळहात त्याच मेहंदीने कदाचित त्या धगीचा अंमल कमी व्हावा म्हणून मालमसारखी त्याच मेहंदीच्या भरवशावर आणि मिरवत रहाते मनावरच्या जखमांचे व्रण त्या मेहंदीच्या लालिम्यात... शुभांगी धन्यवाद! #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान # चित्रकविता

डोंबारी

Image
डोंबारी सुरक्षा राष्ट्राची..संपत्ती सर्वांची! श्रमप्रतिष्ठा की मजा? गावप्रतिष्ठा की सजा? वेठीस का धरावे बाल्यास? का हे नं कळे मोठ्यास? जरी हौसेने धरिली अवजारे हातांत, परि शक्ती नसे ती शरीरात! बालकास ते सांभाळावे, मजेत त्यांना ठेवावे! भाव~जीव तो त्यांचा आणिक, जीवन त्यांचे रक्षावे! फुलवावे,टिकवावे ते बाल्य निरागस, दक्ष रहावे सर्वांनीच हो, रक्षावे ते गोंडस, लोभस! म्हणे, *"मोठयाबरोबर आम्हीही काम करणार,"* आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार! तुम्हीच तर राष्ट्राचे दूत होणार!.राष्ट्र घडवणार... ©वृषाली गोखले   श्रमांचं मोल जो अजाणतेपणी जाणेल त्याला लाभेलच आरोग्य...      शरीराचं आणि मनाचंही भिरभिरत्या मनाला साथ लाभेल कष्टाची तर निश्चिती होईल भावी कलाकृतीची.. ज्ञान अन् मनोरंजनाचे overdose देणार्या मोबाईलपेक्षा घाम अन् श्रमाला प्रतिष्ठा देणारी साधनं बालपणीच जोपासूया भावी विश्वकर्म्याना वंदन आपण करूया.                  - सौ स्मिता परदेशी. ...

दसरा

Image
दसरा जांभळी मनाची बाग सुरांचे राग जांभळ्या ताना घन गर्द जांभळी सांज जांभळी गाज जांभळा कान्हा. पाठीवर जणु वळकटी, बाक तो कटी, मिरवते कुब्जा वाकून चुंबिते चरण, हरीचे कवन, अंतरी पूजा स्पर्शतो हरी झणि तीज, कण्यातुन वीज, ताठला बाणा जांभळा शिरी सरताज, यादवी साज, गोकुळी राणा मयसभा जरी रंगली, लाज लाजली, हरवला जाब जन्मात भोगली तिने, कटू वर्तने, भंगला आब घातला तिच्या पदरात, वैषयी हात, विव्हळते कृष्णा धावला तिच्या विश्वात, रोखला घात, नेणता जाणा जांभळी मनाची बाग सुरांचे राग जांभळ्या ताना घनगर्द जांभळी सांज जांभळी गाज जांभळा कान्हा. शिवानी गोखले.  आला दसऱ्याचा सण दारी झेंडूचे तोरण या सणाची महती घेऊया जाणून। करू शस्त्रांचे पूजन हार नारळ वाहून नसे आराम तयाला कार्य तयाचे महान।। करू सरस्वतीचे पूजन पाटी, पुस्तक लेखणी धूप दीप ओवाळीते तूच विद्येची जननी। करू अपराजिता पूजन अष्टदल रेखाटले मूर्ती स्थापना करून विजयी भवः आशीष तू दिले।। करू शमीचे पूजन विजयाचे ते प्रतीक बहुगुणी शमीपर्णे करी दोष निवारण। सीमोल्लंघन करूनी रावणासी युद्ध केले श्री राम-हनुम...

दुचाकी

Image
दुचाकी एका दुचाकीवर माझा हा संसार हेचि घरकुल माझे पेलतो साऱ्याचाच भार.. भरे पोटाची खळगी तिथे जाईल हा रथ तोल सांभाळा बाळांनो नित्याचीच कसरत..।।   सौ. कल्पना देशमुख  खरा तो संसार पाहताक्षणी जाणीव झाली अंथरुन-पांघरुन, तेलाचे डबे-डूबे घरातील किडूक-मिडूक अवघाची संसार पोटाची खळगी भरण्यासाठी ढोल,बांबू,सुंभ आंनदाने करिती सर्वांचे मनोरंजन वंदना नागरगोजे  श्रमिक हो... विंचवावरचे बिऱ्हाड माझे, आज इथे,तर उद्या तिथे! हातावरचे जगणे माझे, आज इथे,तर उद्या तिथे! घासासाठी फिरणे माझे आज इथे,तर उद्या तिथे! आनंदाचे जगणे माझे, आज इथे,तर उद्या तिथे! सुख~दुःखाचे नवीन ओझे, आज इथे,तर उद्या तिथे! ओझे जरी हे असते माझे, जोडी माणूस,जिथे तिथे! श्रमीक आम्ही,श्रमीक तुम्ही, वास्तवता ही,दिसे इथे! फिरतीवर जरि असतो आम्ही, एकजूट परि जपतो हो! दोन दिसांची संगत जरि ही, आनंदाने जगतो हो! वृषाली गोखले धन्यवाद! #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान #चित्रकविता

काट्यावरील घरटे

Image
काट्यावरील घरटे घरकुल घरकुल पहावे सुरेखसे बांधून. शिकावे पाखरांच्या कौशल्यातून. काडी काडी जमवून घेतात किती कष्ट! पिल्लांसाठी करतात निवारा उत्कृष्ट. हे सुरेखसे,सुंदर घरकुल किती छान! निसर्गाशी राखावे सदैव अनुसंधान! वृषाली गोखले  निवारा इवलीशी चोच,पण कला किती! पाखरांचे कौतुक करावे तरी किती! *घरकुलाचा* हा दैवी चमत्कार! निसर्गाच्या अद्भुताचा,आगळा साक्षात्कार! वृषाली गोखले  घरकुल घरकुल पहावे सुरेखसे बांधून. शिकावे पाखरांच्या कौशल्यातून. काडी काडी जमवून घेतात किती कष्ट! पिल्लांसाठी करतात निवारा उत्कृष्ट. हे सुरेखसे,सुंदर घरकुल किती छान! निसर्गाशी राखावे सदैव अनुसंधान! वृषाली गोखले  इवल्याशा चोचीत काटक्या नी चारा सुबकतेने मांडेन संसाराचा पसारा.        इवल्याशा डोळ्यात        पिल्लांची स्वप्न        त्यांच्यासाठी आणेन        हवे ते अन्न! काटक्या काटक्या गुंफिन मी साऱ्या पिल्लांना देईन म...

शेळी आणि कोकरू

Image
शेळी आणि कोकरू सोहळा सृष्टीचा मातेसमान नाही कोणी जगात श्रेष्ठ, जग पाहताच मिळते! अन्न आम्हां चविष्ट! नुसतेच अन्न ते नसते, लढण्यास शक्ति देते! हे बंध शाश्वताचे अखिल विश्वात या दृश्यासारखे सुंदर दृश्य नाही...माय लेकरांचे बंध तोडणे कोणत्याच देवाला शक्य नाही.. *पिल्लाच्या सुखातच मातेचे सुख* या शाश्वत सत्याला पर्याय नाही... *वात्सल्यरसा* शिवाय,जीवनातही *रस* नाही...शेळीचे करडू असो की गाईचे वासरू,हरिणीचे पाडस असो की म्हशीचे रेडकू.. नावे वेगळाली...पण *या* दृश्या सारखे सुंदर दृश्य अखिल विश्वात नाही! वृषाली गोखले  जननीसम या जगी कुणी नाही  कृपाळू... स्पर्श तुझा अळुमाळू... कुशीत घेई करडूस करी स्तनपान अमृतधारेने तो स्पर्श देई स्वर्गानंद शेळीस मिळे उब वात्सल्याने     प्राणी असो की नारी     हे भाग्य जिच्या भाळी     विश्वात थोर ती जननी     जी आहे लेकुरवाळी..।। सौ. कल्पना देशमुख   धाराऊ ग तूच माझी तूच माझी माऊली अंगावरी उन्ह झेलून धरलीस माझ्यावरी सावली सौ.चंदना उतेकर ...

हापसी

Image
हापसी!! बाल्याच्या उंबरठ्यावरून परतून गेले माझे बालपण... पोटापाण्याच्या चिंतेने ग्रासले पहा माझे मन... सविता कारंजकर  बालपण म्हणजे बालपण म्हणजे मुक्तपणे हिंडणे,फिरणे खेळात रममाण होणे.. गप्पागोष्टी, गाणे यांत धुंद होऊन जाणे..।।      बालपण म्हणजे      क्षणात हसणे,रडणे      अन् रागावणे..      कट्टीबट्टीशी दोस्ती करूनी      दिलखुलास जगणे..।। बालपण म्हणजे निर्व्याज, निर्लोभ मैत्री गुणदोष न पाहता.. अतूट नात्याची खात्री..।।      बालपण म्हणजे      आईची शिस्त,शाबासकी       धपाटा व आदरयुक्त भिती       तिच्या कुशीत निजणे       जणू स्वर्गानंद प्राप्ती..।। बालपण म्हणजे या सृष्टीत उगवणारे निरागस फूलं बालसंस्काराच्या सिंचनाने घडेल आदर्श मूलं..।। सौ. कल्पना देशमुख  निरागस बालकास... बालभाव जीवनातला जाऊच नये कधी! मौनपणातच अ...

पर्यावरण

Image
पर्यावरण   एक एक झाड लाव            रे बाळा     मुक्तछंदातील कविता रात्री माझ्या स्वप्नात वटवृक्ष आला आणि  मला  म्हणाला, का  गं  फेऱ्या  मारतेस  मला ? मी त्याला म्हटले, सावित्रीने यमाकडून  परत आणले     सत्यवानाला , मग आम्ही का फेऱ्या मारू नयेत तुला? सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री पुजते तुला सावित्रीने केले वटपूजनाचे  व्रत म्हणून तिला मिळाला सत्यवान परत ।। म्हणूनच आम्ही ही करतो तुझे पूजन सात  जन्माचे  पतीकडून  घेण्यासाठी   वचन ।। तेव्हा तो म्हणाला, सात जन्मावर आहे तुझा विश्वास? मी म्हणाले, हो माझा तर आहे बुवा  विश्वास ।। त्यावर तो म्हणाला, अगं वेडे, एकाच जन्मात नाकी नऊ आणतात त्यालाच तर पुरूष म्हणतात ।। आणखी तुला खूप सांगायचे आहे .... याच  पुरूषांनी  आमची  ही संख्या  कमी  केली  आहे ।। सात  जन्माचे  काय, पुढच्याच जन्मात आम्ही  दिसू ...