डोंबारी
डोंबारी
सुरक्षा राष्ट्राची..संपत्ती सर्वांची!
श्रमप्रतिष्ठा की मजा?
गावप्रतिष्ठा की सजा?
गावप्रतिष्ठा की सजा?
वेठीस का धरावे बाल्यास?
का हे नं कळे मोठ्यास?
का हे नं कळे मोठ्यास?
जरी हौसेने धरिली अवजारे हातांत,
परि शक्ती नसे ती शरीरात!
परि शक्ती नसे ती शरीरात!
बालकास ते सांभाळावे,
मजेत त्यांना ठेवावे!
भाव~जीव तो त्यांचा आणिक,
जीवन त्यांचे रक्षावे!
मजेत त्यांना ठेवावे!
भाव~जीव तो त्यांचा आणिक,
जीवन त्यांचे रक्षावे!
फुलवावे,टिकवावे ते बाल्य निरागस,
दक्ष रहावे सर्वांनीच हो,
रक्षावे ते गोंडस, लोभस!
दक्ष रहावे सर्वांनीच हो,
रक्षावे ते गोंडस, लोभस!
म्हणे, *"मोठयाबरोबर आम्हीही काम करणार,"*
आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार!
आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार!
तुम्हीच तर राष्ट्राचे दूत होणार!.राष्ट्र घडवणार...
©वृषाली गोखले
श्रमांचं मोल जो अजाणतेपणी जाणेल
त्याला लाभेलच आरोग्य...
शरीराचं आणि मनाचंही
भिरभिरत्या मनाला साथ लाभेल कष्टाची
तर निश्चिती होईल भावी कलाकृतीची..
ज्ञान अन् मनोरंजनाचे overdose देणार्या मोबाईलपेक्षा
घाम अन् श्रमाला प्रतिष्ठा देणारी साधनं बालपणीच जोपासूया
भावी विश्वकर्म्याना वंदन आपण करूया.
- सौ स्मिता परदेशी.
त्याला लाभेलच आरोग्य...
शरीराचं आणि मनाचंही
भिरभिरत्या मनाला साथ लाभेल कष्टाची
तर निश्चिती होईल भावी कलाकृतीची..
ज्ञान अन् मनोरंजनाचे overdose देणार्या मोबाईलपेक्षा
घाम अन् श्रमाला प्रतिष्ठा देणारी साधनं बालपणीच जोपासूया
भावी विश्वकर्म्याना वंदन आपण करूया.
- सौ स्मिता परदेशी.
छोट्या चिमुकल्यांना पहाताच
मन कळवळून येई
ज्यांच्या हाती लेखणी हवी
त्यांच्या हाती कुदळ,फावडी
खेळण्याच्या वयात
काम करण्याची तयारी
हि चिमुकल्येच खरी
देशाची संपत्ती
नवनिर्मिती करती
मन कळवळून येई
ज्यांच्या हाती लेखणी हवी
त्यांच्या हाती कुदळ,फावडी
खेळण्याच्या वयात
काम करण्याची तयारी
हि चिमुकल्येच खरी
देशाची संपत्ती
नवनिर्मिती करती
वंदना नागरगोजे
जागर स्वत्वाचा
निखारे अपेक्षांचे विझवले आहेत कायमचे!
अंगारे फुलवले आहेत,
नव्या आकांक्षांचे!
नव्या आकांक्षांचे!
नवे जीवन,नव्या जाणिवा फुलल्या मनात,
मौनातील आनंद घेणार स्वत्वाच्या साम्राज्यात!
माझ्याभोवती बुरुज आहेत,असंख्य प्रेरणांचे
ठरवले अपेक्षांच्या दलदलीतून ज्योत होऊन बाहेर यायचे
ठरवले कशाला,कुणाला का घाबरायचे?
माझे भाव,जाणिवा व संवेदना याचेच शस्त्र परजायचे
©वृषाली गोखले
आयुष्याच्या दोरीवरचे
खडतर जीवन माझे
तोल सावराया हाती काठी
जगण्याचे ओझे पाठी
खडतर जीवन माझे
तोल सावराया हाती काठी
जगण्याचे ओझे पाठी
अनिता लुगडे.
तोल सावरूनी मी दोरीवर उभी
जरी हाती काठी तरी धडधड ती उरी
पाहण्यास मजला जमला जनमेळावा
परिस्थितीशी झगडूनी पाणी साचे डोळा
जरी हाती काठी तरी धडधड ती उरी
पाहण्यास मजला जमला जनमेळावा
परिस्थितीशी झगडूनी पाणी साचे डोळा
आस अंतरीचे भिडूद्या तुमच्या ह्दयी
नका टाकू पैसे नको सहानुभूती ती
हाती येऊद्या माझ्या पुस्तक पेन्सिल पाटी
हीच मागणी तुला विठ्ठला ठायी ठायी .
नका टाकू पैसे नको सहानुभूती ती
हाती येऊद्या माझ्या पुस्तक पेन्सिल पाटी
हीच मागणी तुला विठ्ठला ठायी ठायी .
वंदना मत्रे
दोरीवरचा तोल सांभाळताना जगण्याचा तोल जमत नाही
अनिमिष डोळ्यानी मी मात्र
आला दिवस
रोज नवे स्वप्न पाही...
अनिमिष डोळ्यानी मी मात्र
आला दिवस
रोज नवे स्वप्न पाही...
मायबापाने जन्म दिला
दिली डोंबाऱ्याची कला
पोटाच खळग भरण्यासाठी
नाचाव लागत मला..
दिली डोंबाऱ्याची कला
पोटाच खळग भरण्यासाठी
नाचाव लागत मला..
कसरत करामत
लोकांची करमणूक
अंगावर वळ आणि
पोटात गरिबीची भूक..
लोकांची करमणूक
अंगावर वळ आणि
पोटात गरिबीची भूक..
फेकलेले आणे दोन आणे
अंगावरती ठिगळ ..
कोरभर भाकरीसंग
जग मिळत सगळं..
अंगावरती ठिगळ ..
कोरभर भाकरीसंग
जग मिळत सगळं..
कधी कधी जातो तोल
खोल अगदी आत..
भयाण रात्री आणि...
माणसांची जात..
खोल अगदी आत..
भयाण रात्री आणि...
माणसांची जात..
ओरबाडलेलं मन;तन
वासनांची आग
शांत निळ्या आकाशाखाली
धगधगणारा राग...
वासनांची आग
शांत निळ्या आकाशाखाली
धगधगणारा राग...
कोडग कोडग करून जातो
एकेक क्षण
उघडा संसार सांगतो
गरिबाला कुठलं असत मन?
एकेक क्षण
उघडा संसार सांगतो
गरिबाला कुठलं असत मन?
नाजूक कोमल देहाचा
पाषाण बनून जातो
डोंबऱ्याचा ढोल मग
बळ नव देतो...
थरथरणार मन घेऊन
चढते दोरीवर..
तोल सावरून धावत सुटते
सरसर दोरीवर..
आयुष्याचा रस्ता तुमच्या
माझ्यासाठी दोरी...
माझा तोल सावरण..
तुमच्या मना उभारी..
पाषाण बनून जातो
डोंबऱ्याचा ढोल मग
बळ नव देतो...
थरथरणार मन घेऊन
चढते दोरीवर..
तोल सावरून धावत सुटते
सरसर दोरीवर..
आयुष्याचा रस्ता तुमच्या
माझ्यासाठी दोरी...
माझा तोल सावरण..
तुमच्या मना उभारी..
ज्याची त्याने शोधावी
सावरणारी काठी
घ्यावी थोडी पुण्याई
आपापल्या पाठी...
पायात घ्यावे बळ
झाकावी मनाची थरथर
आयुष्याची दोरी कशी
चालावी सरसर..
दुर्लक्षावे आलीया गेलीया..
सोबत असावा हिम्मत देणारा "ढोलीया"...
सावरणारी काठी
घ्यावी थोडी पुण्याई
आपापल्या पाठी...
पायात घ्यावे बळ
झाकावी मनाची थरथर
आयुष्याची दोरी कशी
चालावी सरसर..
दुर्लक्षावे आलीया गेलीया..
सोबत असावा हिम्मत देणारा "ढोलीया"...
-©शुभांगी
कसरत
दोरी म्हणजे नाळ माझी
पूजलेली पाचवीला
ताट पायी,हाती काठी
दावणीस लावले जीवाला
पूजलेली पाचवीला
ताट पायी,हाती काठी
दावणीस लावले जीवाला
सौ.चंदना
ढळू न देती तू तोल मनाचा जरासी....
अशक्यप्राय ही तू सहज शक्य करीसी ....
आधाराची काठी आणि ...
त्या काठीवरचा विश्वास
नाही खरंतर
मनातला स्वतः वरचा विश्वास
दोन्ही भक्कम असेल तर
तोल सावरलाच जातो
अगदी दोरीवरही.....
अशक्यप्राय ही तू सहज शक्य करीसी ....
आधाराची काठी आणि ...
त्या काठीवरचा विश्वास
नाही खरंतर
मनातला स्वतः वरचा विश्वास
दोन्ही भक्कम असेल तर
तोल सावरलाच जातो
अगदी दोरीवरही.....
नाहीतर तोलच तो...
कुठेही घसरतो
अगदी गुळगुळीत डांबरी
वाटेवरही.....
कुठेही घसरतो
अगदी गुळगुळीत डांबरी
वाटेवरही.....
सौ स्मिता परदेशी.
डोईवरचा संसार
संगे खेळ त्याचा चाले
जन पाहतीे आनंदे
पोटासाठी ऊन प्याले..।।
संगे खेळ त्याचा चाले
जन पाहतीे आनंदे
पोटासाठी ऊन प्याले..।।
गज ठोकले भुईले
रस्ता दोरीचा म्या केला
पोर चालते झुलते
जीव कासावीस झाला..।।
रस्ता दोरीचा म्या केला
पोर चालते झुलते
जीव कासावीस झाला..।।
हाती पेटतं रिंगण
बारक्या ढोल वाजवितो
आगीतून उडी घेई
किती चटके सोसतो..।।
बारक्या ढोल वाजवितो
आगीतून उडी घेई
किती चटके सोसतो..।।
चिमुकलेही पाखरं
बालपण करपले
निरागस ह्या कळ्यांचे
फुलं कधी ना उमले...।।
बालपण करपले
निरागस ह्या कळ्यांचे
फुलं कधी ना उमले...।।
हाती झोळी घेऊन या
मागे घामाचा पैसा
भुकेला हा जीव
दोन पैकं तरी टाका...।।
मागे घामाचा पैसा
भुकेला हा जीव
दोन पैकं तरी टाका...।।
सौ. कल्पना देशमुख
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment