Posts

Showing posts from December, 2018

मधमाशी पोळे

Image
दुसऱ्यासाठी करी कर्म... हाच यासाठी श्रेष्ठ धर्म.... डॉ.अस्मिता भस्मे  मधुर रसाचा संचय करण्या नित्य निरंतर कार्य करी षटकोनांचा मधुकोष भरण्या सदैव सज्ज मधुमक्षिका ही अनिता संपत लुगडे. शिक्षिका, चेंबूर हायस्कूल.   मधुघट मधुघट हा तो साक्षात् अमृत! निसर्गाची ही करणी अद्भुत! फुलामधिल ही *मधु* संपत्ती! पळती व्याधी आणि विपत्ति संघकार्य ते अपूर्व,रेखीव! योजन सुद्धा,असते आखीव! सारे शिस्तीत,सारे नियोजित! जमून येते सर्व सुसंगत! किमया ही तर नयनमनोहर! आपण शिकूया,कार्य खरोखर! वृषाली गोखले  मधमाशी एक कीटक अनेक प्रजाती यात मकरंद करी गोळा साठवण करी पोळ्यात     समुहात हिचे वास्तव्य     विनाविश्रांती चाले कार्य     मधमाशांचे संवर्धन करूनी     करा निसर्गास सहकार्य..!! सौ. कल्पना देशमुख  किती सुंदर पोळे बघता क्षणीच मन मोहे अदभुत किमया मधमाशीची पोळ्यावरती मेणाचा थर पोळ्या खाली मधुर मध खरी किमया तर निसर्गाचीच वंदना नागरगोजे धन्यवाद!! #ज्ञानभाषामराठीप्रत...

गिधाड

Image
गिधाडं.... शेवटच्या आचक्यांची आतुरतेनं वाट बघणारी ती जंगली गिधाडं आणि जिवंतपणीच लचके तोडणारी माणसातली गिधाडं कधी शरीराचे कधी मनाचे.... कोपर्याकोपर्यावर प्रत्येक वळणावर संधी मिळालीच तर गर्दीच्या केंद्रावर संस्कारांच्या आवरणाखाली दडलेली पाशवी गिधाडं..... वाट फुटेल तिकडे धाव तू ऊर फुटेस्तोवर आर्त किंकाळ्या मार तू आभाळ भरेस्तोवर त्याचेही व्हिडिओ व्हायरल करून लाइक मिळवणारी माॅडर्न गिधाडं..... गिधाडं.....        सौ स्मिता परदेशी.  अरे गिधाडा... तू पहातोस काय मजकडे.. माझ्या अर्धमेल्या शरीराकडे। तू फक्त मृतदेह मांस भक्षण करतो, पोट भरतो अन् स्वच्छ करतो जंगल परिसर। या द्विपाद मानवी प्राण्याला काय म्हणावे... तो जीवंत माणसालाच निर्जीव करतो... गलिच्छ करतो सारी सृष्टी। बोध घे तू यातून... कधी बदलतील तुझे विचार..?? अन् बदलेल का तुझी दृष्टी... सौ. कल्पना देशमुख  मौनातील संवेदना! जीवो जीवस्य जीवनम् हा निसर्गाचा न्याय आहे, माझी देवदत्त भूमिका मृतभक्ष्य खाणे आहे! लचका नका म्हणू,माझा निसर्गदत्त घास आहे तो, मेल्या...

चंद्र

Image
सुंदर शीतल हा चंद्रकांत पाहुनी ज्यासी होई मन प्रसन्न आणि शांत डॉ.अस्मिता भस्मे  नेहमीचाच चंद्रमा, नेहमीचीच पौर्णिमा, न्हाऊन शारद चांदण्यात, वेड लावी हा प्रिय मना.. अलवार पावलांनी हुरहुर लावी जीवा, स्निग्ध दुधात डोकावूनी प्रियास करी खाणाखुणा.. काय म्हणावे या चंद्राला, क्षणात दादा..क्षणात मामा, कोण जागते पाहताना.. अरे ,झालास प्रियतमेची तू मनमोहक उपमा... सविता गणेश   आहे तुझेच सारे तुझ्याचसाठी जपलेले चंद्राच्या शीतलतेला म्हणूनच मी कवेत घेतलेले!! मृणाल पाटोळे  चषकातुनी दुधाच्या चंद्रबिब हासणारं... चांदणं कोजागिरीच्या डोळ्यांत जागणारं.. तृषार्त शीशामृताचे बरसून या धरेवर... सखया उजळत्या तुझ्या मिठीतून ओघळणारं..!! जयश्री खराडे.  शरदाच्या चादंण्यात चंद्र दिसतोय सुरेख झाडाच्या अल्याड पल्याड फिरतोय दिमाखात आज चंद्राचे भासे अनोखे तेजदिप केशरयुक्त दुध प्यावे चंद्राच्या पटांगणात आजचा दिन परत परत यावा यातच चंद्राचे थोरपण वंदना नागरगोजे  चंद्रमौळी झोपडीत माझ्या चंद्रमौळी झोपडीत माझ्या शशी ऐसा प्रकटला...

रस्ता,वळण,झाडी

Image
🔶सुंदर सुंदर वळणाची नागमोडी वाट गाडीतून पहाताना असंख्य चित्रे डोळ्यासमोरून भुरकन जात त्याच त्याच रस्त्यावरून परत परत जाता गतजिवनातील आठवणींनी मन उचंबळुन येई माझ्या माहेरची मला आठवणच येई परत परत वाटे त्याच त्याच रस्त्यावरून जावे निसर्गाच्या कुशीत झोपुन जावे वंदना नागरगोजे 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 🔶वळणाची वाट आणि अवघड घाट दिस जातील सरुन असता तुझी रे साथ अनिता लुगडे 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 🔶गतस्मृती उजळल्या निसर्गाच्या कुशीत रमल्या.. या वाटेवर चालतांना नजरेसमोर आल्या..।। याच अनोळखी वाटेत आपले नाते जुळले.. जीवनातील सहप्रवासी जीवनसाथी झाले..।।      सौ. कल्पना देशमुख 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 🔶रस्ता.... घडवणारा पढवणारा जोडणारा तोडणारा.. कोवळ्या जीवाला जीवनचक्रात फिरवणारा वाळणावळणावर नवनिर्मितीचा आनंद देणारा.. सतत चालणारा सोबत करणारा तरीही आपलं अवकाश सांभाळणारा... आपल्यासोबतच वयाने आणि अनुभवाने समृद्ध होणारा.. योग्यायोग्याची जाणीव करून देणारा.. वळणावळणाचा नागमोडी... यौवनातल्या भावनांसारखा... तरल कधी चंचल कधी सोबत धावणारा... कधी सरळ निर्वि...