चंद्र
सुंदर शीतल हा चंद्रकांत
पाहुनी ज्यासी होई
मन प्रसन्न आणि शांत
पाहुनी ज्यासी होई
मन प्रसन्न आणि शांत
डॉ.अस्मिता भस्मे
नेहमीचाच चंद्रमा,
नेहमीचीच पौर्णिमा,
न्हाऊन शारद चांदण्यात,
वेड लावी हा प्रिय मना..
नेहमीचीच पौर्णिमा,
न्हाऊन शारद चांदण्यात,
वेड लावी हा प्रिय मना..
अलवार पावलांनी
हुरहुर लावी जीवा,
स्निग्ध दुधात डोकावूनी
प्रियास करी खाणाखुणा..
हुरहुर लावी जीवा,
स्निग्ध दुधात डोकावूनी
प्रियास करी खाणाखुणा..
काय म्हणावे या चंद्राला,
क्षणात दादा..क्षणात मामा,
कोण जागते पाहताना..
अरे ,झालास प्रियतमेची
तू मनमोहक उपमा...
सविता गणेश
क्षणात दादा..क्षणात मामा,
कोण जागते पाहताना..
अरे ,झालास प्रियतमेची
तू मनमोहक उपमा...
सविता गणेश
आहे तुझेच सारे
तुझ्याचसाठी जपलेले
चंद्राच्या शीतलतेला
म्हणूनच मी कवेत घेतलेले!!
तुझ्याचसाठी जपलेले
चंद्राच्या शीतलतेला
म्हणूनच मी कवेत घेतलेले!!
मृणाल पाटोळे
चषकातुनी दुधाच्या चंद्रबिब हासणारं...
चांदणं कोजागिरीच्या डोळ्यांत जागणारं..
तृषार्त शीशामृताचे बरसून या धरेवर...
सखया उजळत्या तुझ्या मिठीतून ओघळणारं..!!
चांदणं कोजागिरीच्या डोळ्यांत जागणारं..
तृषार्त शीशामृताचे बरसून या धरेवर...
सखया उजळत्या तुझ्या मिठीतून ओघळणारं..!!
जयश्री खराडे.
शरदाच्या चादंण्यात चंद्र
दिसतोय सुरेख
झाडाच्या अल्याड पल्याड
फिरतोय दिमाखात
आज चंद्राचे भासे अनोखे
तेजदिप
केशरयुक्त दुध प्यावे
चंद्राच्या पटांगणात
आजचा दिन परत परत यावा
यातच चंद्राचे थोरपण
दिसतोय सुरेख
झाडाच्या अल्याड पल्याड
फिरतोय दिमाखात
आज चंद्राचे भासे अनोखे
तेजदिप
केशरयुक्त दुध प्यावे
चंद्राच्या पटांगणात
आजचा दिन परत परत यावा
यातच चंद्राचे थोरपण
वंदना नागरगोजे
चंद्रमौळी झोपडीत माझ्या
चंद्रमौळी झोपडीत माझ्या
शशी ऐसा प्रकटला..
कौमुदीही लखलखली
दशदिशा बघ उजळल्या..।।
झोपडीतच पेरतो मी
शुभ्रतेचे चांदणे...
निर्मळ, निरागस मन तुझे
न लगे काही सांगणे..।।
चंद्रसाक्षीने बहरली
प्रीत आपली साजना..
तरंग उठले अंतरी
मधुचंद्राची रात्र ना..।।
झोपडीत सजवले तू
तारकांचे झुंबर...
भाकरीचा चंद्र माझा
लालबुंद तव्यावर...।।
चांदणं फुलांचा सडा
परसदारी शिंपला..
कोजागिरीचा चंद्र हा
नभातून हळूच हासला..।।
सौ. कल्पना देशमुख
(नवी मुंबई)
शशी ऐसा प्रकटला..
कौमुदीही लखलखली
दशदिशा बघ उजळल्या..।।
झोपडीतच पेरतो मी
शुभ्रतेचे चांदणे...
निर्मळ, निरागस मन तुझे
न लगे काही सांगणे..।।
चंद्रसाक्षीने बहरली
प्रीत आपली साजना..
तरंग उठले अंतरी
मधुचंद्राची रात्र ना..।।
झोपडीत सजवले तू
तारकांचे झुंबर...
भाकरीचा चंद्र माझा
लालबुंद तव्यावर...।।
चांदणं फुलांचा सडा
परसदारी शिंपला..
कोजागिरीचा चंद्र हा
नभातून हळूच हासला..।।
सौ. कल्पना देशमुख
(नवी मुंबई)

Comments
Post a Comment