मधमाशी पोळे
दुसऱ्यासाठी करी कर्म...
हाच यासाठी श्रेष्ठ धर्म....
हाच यासाठी श्रेष्ठ धर्म....
डॉ.अस्मिता भस्मे
मधुर रसाचा संचय करण्या
नित्य निरंतर कार्य करी
षटकोनांचा मधुकोष भरण्या
सदैव सज्ज मधुमक्षिका ही
नित्य निरंतर कार्य करी
षटकोनांचा मधुकोष भरण्या
सदैव सज्ज मधुमक्षिका ही
अनिता संपत लुगडे.
शिक्षिका, चेंबूर हायस्कूल.
शिक्षिका, चेंबूर हायस्कूल.
मधुघट
मधुघट हा तो साक्षात् अमृत!
निसर्गाची ही करणी अद्भुत!
फुलामधिल ही *मधु* संपत्ती!
पळती व्याधी आणि विपत्ति
संघकार्य ते अपूर्व,रेखीव!
योजन सुद्धा,असते आखीव!
सारे शिस्तीत,सारे नियोजित!
जमून येते सर्व सुसंगत!
किमया ही तर नयनमनोहर!
आपण शिकूया,कार्य खरोखर!
वृषाली गोखले
मधमाशी एक कीटक
अनेक प्रजाती यात
मकरंद करी गोळा
साठवण करी पोळ्यात
समुहात हिचे वास्तव्य
विनाविश्रांती चाले कार्य
मधमाशांचे संवर्धन करूनी
करा निसर्गास सहकार्य..!!
अनेक प्रजाती यात
मकरंद करी गोळा
साठवण करी पोळ्यात
समुहात हिचे वास्तव्य
विनाविश्रांती चाले कार्य
मधमाशांचे संवर्धन करूनी
करा निसर्गास सहकार्य..!!
सौ. कल्पना देशमुख
किती सुंदर पोळे
बघता क्षणीच मन मोहे
अदभुत किमया मधमाशीची
पोळ्यावरती मेणाचा थर
पोळ्या खाली मधुर मध
खरी किमया तर निसर्गाचीच
बघता क्षणीच मन मोहे
अदभुत किमया मधमाशीची
पोळ्यावरती मेणाचा थर
पोळ्या खाली मधुर मध
खरी किमया तर निसर्गाचीच
वंदना नागरगोजे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment