गिधाड
गिधाडं....
शेवटच्या आचक्यांची आतुरतेनं वाट बघणारी
ती जंगली गिधाडं
आणि जिवंतपणीच लचके तोडणारी
माणसातली गिधाडं
कधी शरीराचे कधी मनाचे....
शेवटच्या आचक्यांची आतुरतेनं वाट बघणारी
ती जंगली गिधाडं
आणि जिवंतपणीच लचके तोडणारी
माणसातली गिधाडं
कधी शरीराचे कधी मनाचे....
कोपर्याकोपर्यावर प्रत्येक वळणावर
संधी मिळालीच तर गर्दीच्या केंद्रावर
संस्कारांच्या आवरणाखाली दडलेली
पाशवी गिधाडं.....
संधी मिळालीच तर गर्दीच्या केंद्रावर
संस्कारांच्या आवरणाखाली दडलेली
पाशवी गिधाडं.....
वाट फुटेल तिकडे धाव तू
ऊर फुटेस्तोवर
आर्त किंकाळ्या मार तू
आभाळ भरेस्तोवर
त्याचेही व्हिडिओ व्हायरल करून
लाइक मिळवणारी
माॅडर्न गिधाडं.....
गिधाडं.....
सौ स्मिता परदेशी.
ऊर फुटेस्तोवर
आर्त किंकाळ्या मार तू
आभाळ भरेस्तोवर
त्याचेही व्हिडिओ व्हायरल करून
लाइक मिळवणारी
माॅडर्न गिधाडं.....
गिधाडं.....
सौ स्मिता परदेशी.
अरे गिधाडा...
तू पहातोस काय मजकडे..
माझ्या अर्धमेल्या शरीराकडे।
तू फक्त मृतदेह मांस भक्षण करतो, पोट भरतो
अन् स्वच्छ करतो जंगल परिसर।
या द्विपाद मानवी प्राण्याला काय म्हणावे...
तो जीवंत माणसालाच निर्जीव करतो...
गलिच्छ करतो सारी सृष्टी।
बोध घे तू यातून...
कधी बदलतील तुझे विचार..??
अन् बदलेल का तुझी दृष्टी...
तू पहातोस काय मजकडे..
माझ्या अर्धमेल्या शरीराकडे।
तू फक्त मृतदेह मांस भक्षण करतो, पोट भरतो
अन् स्वच्छ करतो जंगल परिसर।
या द्विपाद मानवी प्राण्याला काय म्हणावे...
तो जीवंत माणसालाच निर्जीव करतो...
गलिच्छ करतो सारी सृष्टी।
बोध घे तू यातून...
कधी बदलतील तुझे विचार..??
अन् बदलेल का तुझी दृष्टी...
सौ. कल्पना देशमुख
मौनातील संवेदना!
जीवो जीवस्य जीवनम्
हा निसर्गाचा न्याय आहे,
हा निसर्गाचा न्याय आहे,
माझी देवदत्त भूमिका मृतभक्ष्य खाणे आहे!
लचका नका म्हणू,माझा निसर्गदत्त घास आहे तो,
मेल्यावरच भक्षायला त्या प्रेताकडे, मी जातो!
मेल्यावरच भक्षायला त्या प्रेताकडे, मी जातो!
हा एक,बालजीव,मरण यातना भोगतोय,
शक्य तेवढा,मनाने मी दुःखात सहभागी होतोय!
शक्य तेवढा,मनाने मी दुःखात सहभागी होतोय!
हवे तर,भूमिकेत बदल करूया का?
मी सांगतो,तसे देवाला!
नको पण राहूदे,
माणसांच्या भूमिकेत कदाचित विसरू आम्हीं नियत,
आणि गिधाडांच्या भूमिकेत माणसेही विसरतील त्यांची नियत!
मी सांगतो,तसे देवाला!
नको पण राहूदे,
माणसांच्या भूमिकेत कदाचित विसरू आम्हीं नियत,
आणि गिधाडांच्या भूमिकेत माणसेही विसरतील त्यांची नियत!
वृषाली गोखले
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment