दुचाकी

दुचाकी
एका दुचाकीवर
माझा हा संसार
हेचि घरकुल माझे
पेलतो साऱ्याचाच भार..
भरे पोटाची खळगी
तिथे जाईल हा रथ
तोल सांभाळा बाळांनो
नित्याचीच कसरत..।।
  सौ. कल्पना देशमुख

खरा तो संसार
पाहताक्षणी जाणीव झाली
अंथरुन-पांघरुन,
तेलाचे डबे-डूबे
घरातील किडूक-मिडूक
अवघाची संसार
पोटाची खळगी भरण्यासाठी
ढोल,बांबू,सुंभ
आंनदाने करिती
सर्वांचे मनोरंजन
वंदना नागरगोजे


श्रमिक हो...
विंचवावरचे बिऱ्हाड माझे,
आज इथे,तर उद्या तिथे!
हातावरचे जगणे माझे,
आज इथे,तर उद्या तिथे!
घासासाठी फिरणे माझे
आज इथे,तर उद्या तिथे!
आनंदाचे जगणे माझे,
आज इथे,तर उद्या तिथे!
सुख~दुःखाचे नवीन ओझे,
आज इथे,तर उद्या तिथे!
ओझे जरी हे असते माझे,
जोडी माणूस,जिथे तिथे!
श्रमीक आम्ही,श्रमीक तुम्ही,
वास्तवता ही,दिसे इथे!
फिरतीवर जरि असतो आम्ही,
एकजूट परि जपतो हो!
दोन दिसांची संगत जरि ही,
आनंदाने जगतो हो!
वृषाली गोखले
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र