पर्यावरण
पर्यावरण
एक एक झाड लाव
रे बाळा
रे बाळा
मुक्तछंदातील कविता
रात्री माझ्या स्वप्नात वटवृक्ष आला
आणि मला म्हणाला,
का गं फेऱ्या मारतेस मला ?
आणि मला म्हणाला,
का गं फेऱ्या मारतेस मला ?
मी त्याला म्हटले, सावित्रीने यमाकडून परत आणले सत्यवानाला ,
मग आम्ही का फेऱ्या मारू नयेत तुला?
मग आम्ही का फेऱ्या मारू नयेत तुला?
सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री पुजते तुला
सावित्रीने केले वटपूजनाचे व्रत
म्हणून तिला मिळाला सत्यवान परत ।।
म्हणून तिला मिळाला सत्यवान परत ।।
म्हणूनच आम्ही ही करतो तुझे पूजन
सात जन्माचे पतीकडून घेण्यासाठी वचन ।।
सात जन्माचे पतीकडून घेण्यासाठी वचन ।।
तेव्हा तो म्हणाला,
सात जन्मावर आहे तुझा विश्वास?
मी म्हणाले, हो माझा तर आहे बुवा विश्वास ।।
सात जन्मावर आहे तुझा विश्वास?
मी म्हणाले, हो माझा तर आहे बुवा विश्वास ।।
त्यावर तो म्हणाला, अगं वेडे, एकाच जन्मात नाकी नऊ आणतात
त्यालाच तर पुरूष म्हणतात ।।
त्यालाच तर पुरूष म्हणतात ।।
आणखी तुला खूप सांगायचे आहे ....
याच पुरूषांनी आमची ही संख्या कमी केली आहे ।।
याच पुरूषांनी आमची ही संख्या कमी केली आहे ।।
सात जन्माचे काय, पुढच्याच जन्मात आम्ही दिसू की नाही
माहित नाही आम्हाला ।
मग पुढच्या जन्मी फेऱ्या मारणार कुणाला?
माहित नाही आम्हाला ।
मग पुढच्या जन्मी फेऱ्या मारणार कुणाला?
खरचं की पटले मला त्याचे म्हणणे ,
वृक्षाविना कसे असेल पुढच्या
पिढीचे जगणे ?
वृक्षाविना कसे असेल पुढच्या
पिढीचे जगणे ?
मी त्याला बोलायला गेले अन
अचानक जागी झाले ।।
अचानक जागी झाले ।।
स्वप्नात सांगून गेला वटवृक्ष
बाळांनो प्रत्येकाने लावा एक एक वृक्ष ।।।
बाळांनो प्रत्येकाने लावा एक एक वृक्ष ।।।
श्रीमती सोजर ईश्वर मस्के
सोपी कविता
एक दोन तीन चार
पर्यावरण रक्षणाचा करा विचार
पर्यावरण रक्षणाचा करा विचार
पाच सहा सात आठ
पर्यावरणाशी जोडू गाठ
पर्यावरणाशी जोडू गाठ
न ऊ दहा अकरा बारा
पर्यावरण रक्षण हाच आमचा नारा.
पर्यावरण रक्षण हाच आमचा नारा.
तेरा चौदा पंधरा सोळा
पर्यावरणाविषयी करू माहिती गोळा
पर्यावरणाविषयी करू माहिती गोळा
सतरा अठरा एकोणीस वीस
पर्यावरण रक्षणासाठी या मदतनिस
पर्यावरण रक्षणासाठी या मदतनिस
शुभांगी कदम
रूजलेल्या बीला
फुटली पाने दोन
आर्त हाक ऐका
करा माझे संवर्धन ||
प्रदूषणापासून करा
माझे रक्षण
सेंद्रीय खत व पानी
यानेच करा पोषण ||
वटवृक्ष होणार मी जर
केले नैसर्गिक पालन
भरभरून देणार मी
हे आहे माझे वचन ||
कल्पना देशमुख
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment