गर्द जांभळं निसर्गचित्र

चित्र-गर्द जांभळं निसर्गचित्र

मोक्षदा नूलकर

निळ्या भोर आकाशी
उष: काली दिनकर  प्रगटला
अवनी हि लाजली 
क्षितीजावर लाली चढली
बाभूळ हि निश्चल  उभा
निसर्गाची किमया बघा

वृषाली गोखले

भाव~भावना सांजवेळच्या 
रंगछटा त्या नभातळीच्या

वृषाली गोखले

संधिकाल हा भावुक झाला
आभाळी तो अर्क शोभला

दीपा ठाणेकर

कातरवेळी दाटल्या संध्याछाया,
आकाशातून मनाशी 
कुजबुणा-या ,
दिशादिशांतून आले 
एकाकीपण, 
शुक्राची परि एक 
चांदणी, 
लकालकत राही उभी एकटी, 
मिटून घेता काजळ 
निळे गहिरे, 
तिचे अस्तित्व सदा 
खुणावे....

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता



Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र