काट्यावरील घरटे

काट्यावरील घरटे
घरकुल
घरकुल पहावे सुरेखसे
बांधून.
शिकावे पाखरांच्या कौशल्यातून.
काडी काडी जमवून घेतात किती कष्ट!
पिल्लांसाठी करतात निवारा उत्कृष्ट.
हे सुरेखसे,सुंदर घरकुल किती छान!
निसर्गाशी राखावे सदैव अनुसंधान!
वृषाली गोखले

निवारा
इवलीशी चोच,पण कला किती!
पाखरांचे कौतुक करावे तरी किती!
*घरकुलाचा* हा दैवी चमत्कार!
निसर्गाच्या अद्भुताचा,आगळा साक्षात्कार!
वृषाली गोखले

घरकुल
घरकुल पहावे सुरेखसे
बांधून.
शिकावे पाखरांच्या कौशल्यातून.
काडी काडी जमवून घेतात किती कष्ट!
पिल्लांसाठी करतात निवारा उत्कृष्ट.
हे सुरेखसे,सुंदर घरकुल किती छान!
निसर्गाशी राखावे सदैव अनुसंधान!
वृषाली गोखले

इवल्याशा चोचीत
काटक्या नी चारा
सुबकतेने मांडेन
संसाराचा पसारा.
       इवल्याशा डोळ्यात
       पिल्लांची स्वप्न
       त्यांच्यासाठी आणेन
       हवे ते अन्न!
काटक्या काटक्या
गुंफिन मी साऱ्या
पिल्लांना देईन
मायेचा उबारा
वंदना नागरमोजे

तुझ्या माझ्या संसारा
घेऊन येईल सारया आसमंताचा पसारा..
इवल्याशा घरकुला
नित्य बहरू दे आपला प्रीत फुलोरा...!!
जयश्री खराडे

भाषा नाही हात नाही           
बुद्धी तिची महान                
कोणत्याही झाडावर घरटे बांधते छान                       अभियंत्यालाही लाजवेल   
अशी तिची कला              
पुढच्या जन्मी देव बाप्पा     
चिमणी बनवशील का मला
काट्या कुटया जमवित
उन,वारा, पाऊस झेलत
नाही डगमगत
नाही जिद्द सोडत
अनंत अडचणींना तोंड देत
बनविते हक्काचे घर
हाच आहे आज माणसासमोर
नवा आदर्श
सौ.वंदना नागरगोजे

पिलासाठी घरटे बांधते
पक्षिण हो खास
पण घरटीतून उडुनी गेल्यावर
होते मन उदास
प्रिया फडके

काट्याकुट्या जमवून,
सजले घरकुल माझे!
मायेच्या ओंजळीने,
निळ्या आभाळी तरंगे!
इवल्याशा पानामध्ये,
स्वप्न लागे हिरवळू
भेटीलगी जीवा,
बघ येईल साजणा!!
मृणाल

घरकुल तुझे नी माझे
जरी असे काट्याकुट्यांचे
ईथे वास्तव्य फक्त
मायेचे आणि प्रेमाचे
डॉ.अस्मिता भस्मे

जरी गुंफले मी घरटे कोरड्या काट्याकुटक्यांत
त्याला नव्हाळीचा साज दिला एका गं पानात
तुझ्या येण्याने हरखेल सारा संसारच आज
दूर वाटेवर हिरव्या तुझ्या पंखांची गं गाज
शेताच्या बांधावर दिसे फक्त शुष्क ही डहाळी
स्वप्न हिरवाईने नटेल आपल्या चारही गं डोळी
सोबतीला साचलेले थोडे आभाळाचे पाणी
आणि उद्याच्या सुखाची, गाऊ दोघे आपण गाणी
आज काटक्याच माझ्या आणि भणाण रानवारा
तुझ्या संगे पुतांसाठी घडवू मायेचा उबारा
© दीप्ती पुजारी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र