मनालीतील रम्य पहाट

करंकुशीत डोंगराच्या..
धूसर धुके दाटलेले..
कुपीत मनाच्या जणू
गुपित साचलेले..
खडा पहारा करत
झाड
नियंत्याला
वंदन करते...
सविता करंजकर

ऋतूच्या कुशीत हरवेन मी..
माझी मला गवसेन मी
सविता करंजकर

ते कोण दडले डोंगरापालिकडे,
ओज~तेज दिनकराचे,
प्रकाशले हिमकडे
ते काव्य स्फुरले,प्रसन्न उषा दर्शनाने,
पण हे तर स्वप्न सखी गं,
आमंत्रिले यामिनीने
वृषाली गोखले

गिरीच्या कुशीत धुके विसावले
मन हरकून गेले गिरीच्या छायेत
चित्त हरखून गेले,
तरु हर्षुन डोले.....
ऋतुजा गवस

वसंताचे आगमन..
कोकिळेचे गूंजन..
सख्यांनो करूया..
चंदनाला वंदन...
सविता करंजकर

गिरिशिखरावरी भुरे धुके दाटले ,
मनी अनामिक काहुर माजले ,
भोवती निसर्गाचे रंग साजिरे ,
वसुंधरेने पर्जन्यास प्रीतीचे पत्र धाडले.
दीपा ठाणेकर

धरणीमायेने उंच नभी
कसे पसरले बाहू
झरझर आभाळातून
दाट धुके लागे वाहू
सौ.चंदना उतेकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता


Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र