मेहंदी

मेहंदी
हातावरच्या मेहंदीने
लाल भडक रंग घेतला की
प्रेम खुलत म्हणतात...
मी मात्र पाहिले
त्याच लाल रंगात
जळणारी 'ती'..
अविरत आणि अविश्रांत..
कधी प्रथा परंपरांच्या नावाखाली
कधी प्रेमात आणि नात्यात बांधलेली
प्रत्येकाला आपलं समजून
झोकून देऊन केवळ आणि केवळ प्रेम उधळणारी...
स्वतःला लागणाऱ्या झळांची
कोणतीही खूण चेहऱ्यावर न दाखवता
आयुष्यभर फक्त जळणारी 'ती'...
नशिबाने कधी वणवा बनून
तर कधी पणती बनून...
पुन्हा पुन्हा भरत राहते
आपले तळहात
त्याच मेहंदीने
कदाचित त्या धगीचा अंमल
कमी व्हावा म्हणून
मालमसारखी त्याच मेहंदीच्या भरवशावर
आणि मिरवत रहाते
मनावरच्या जखमांचे व्रण
त्या मेहंदीच्या लालिम्यात...
शुभांगी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र