हापसी

हापसी!!
बाल्याच्या उंबरठ्यावरून
परतून गेले माझे बालपण...
पोटापाण्याच्या चिंतेने
ग्रासले पहा माझे मन...
सविता कारंजकर

बालपण म्हणजे
बालपण म्हणजे
मुक्तपणे हिंडणे,फिरणे
खेळात रममाण होणे..
गप्पागोष्टी, गाणे यांत
धुंद होऊन जाणे..।।
     बालपण म्हणजे
     क्षणात हसणे,रडणे
     अन् रागावणे..
     कट्टीबट्टीशी दोस्ती करूनी
     दिलखुलास जगणे..।।
बालपण म्हणजे
निर्व्याज, निर्लोभ मैत्री
गुणदोष न पाहता..
अतूट नात्याची खात्री..।।
     बालपण म्हणजे
     आईची शिस्त,शाबासकी
      धपाटा व आदरयुक्त भिती
      तिच्या कुशीत निजणे
      जणू स्वर्गानंद प्राप्ती..।।
बालपण म्हणजे
या सृष्टीत उगवणारे
निरागस फूलं
बालसंस्काराच्या सिंचनाने
घडेल आदर्श मूलं..।।
सौ. कल्पना देशमुख

निरागस बालकास...
बालभाव जीवनातला जाऊच नये कधी!
मौनपणातच असते,
अनुभूती साधी!
बालकभावात जगणे,
खरेच फार कठीण!
सगळ्या त्या अमूर्त क्षणांची
असते ती सुखद आठवण!
वृषाली गोखले
श्रमप्रतिष्ठा की मजा?
गावप्रतिष्ठा की सजा?
वेठीस का धरावे बाल्यास?
का हे नं कळे मोठ्यास?
जरी हौसेने धरिली अवजारे हातांत,
परि शक्ती नसे ती शरीरात!
बालकास ते सांभाळावे,
मजेत त्यांना ठेवावे!
भाव~जीव तो त्यांचा आणिक,
जीवन त्यांचे रक्षावे!
फुलवावे,टिकवावे ते बाल्य निरागस,
दक्ष रहावे सर्वांनीच हो,
रक्षावे ते गोंडस, लोभस!
म्हणे, *"मोठयाबरोबर आम्हीही काम करणार,"*
आम्हीं नाही हो तुम्हांला काम करू देणार!
तुम्हीच तर राष्ट्राचे दूत होणार!.राष्ट्र घडवणार...
वृषाली गोखले
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

 चित्र पहाता मनात आले
खेड्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवे
उन्हा-तान्हात बालके वणवण फिरे
हापस्यावरती हसतखेळत आळीपाळीने पाणी उपसीत
एकमेकांना समजून घेऊन आंघोळ आटपीत
असेच संस्कार कायम ठेवा
पाण्याचे महत्त्व जाणा
लहानपणापासून सवय लावा
पाणी हेच जीवन आहे

वंदना नागरगोजे
तृष्णेसाठी उदक उपसती ...
ते पाण्याचे मोल जाणती...

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र