शेळी आणि कोकरू
शेळी आणि कोकरू
सोहळा सृष्टीचा
मातेसमान नाही कोणी जगात श्रेष्ठ,
जग पाहताच मिळते! अन्न आम्हां चविष्ट!
नुसतेच अन्न ते नसते,
लढण्यास शक्ति देते!
जग पाहताच मिळते! अन्न आम्हां चविष्ट!
नुसतेच अन्न ते नसते,
लढण्यास शक्ति देते!
हे बंध शाश्वताचे
अखिल विश्वात या दृश्यासारखे सुंदर दृश्य नाही...माय लेकरांचे बंध तोडणे कोणत्याच देवाला शक्य नाही..
*पिल्लाच्या सुखातच मातेचे सुख* या शाश्वत सत्याला पर्याय नाही...
*वात्सल्यरसा* शिवाय,जीवनातही *रस* नाही...शेळीचे करडू असो की गाईचे वासरू,हरिणीचे पाडस असो की म्हशीचे रेडकू..
नावे वेगळाली...पण *या* दृश्या सारखे सुंदर दृश्य अखिल विश्वात नाही!
*पिल्लाच्या सुखातच मातेचे सुख* या शाश्वत सत्याला पर्याय नाही...
*वात्सल्यरसा* शिवाय,जीवनातही *रस* नाही...शेळीचे करडू असो की गाईचे वासरू,हरिणीचे पाडस असो की म्हशीचे रेडकू..
नावे वेगळाली...पण *या* दृश्या सारखे सुंदर दृश्य अखिल विश्वात नाही!
वृषाली गोखले
जननीसम या जगी कुणी नाही कृपाळू...
स्पर्श तुझा अळुमाळू...
कुशीत घेई करडूस
करी स्तनपान अमृतधारेने
तो स्पर्श देई स्वर्गानंद
शेळीस मिळे उब वात्सल्याने
प्राणी असो की नारी
हे भाग्य जिच्या भाळी
विश्वात थोर ती जननी
जी आहे लेकुरवाळी..।।
सौ. कल्पना देशमुख
धाराऊ ग तूच माझी
तूच माझी माऊली
अंगावरी उन्ह झेलून
धरलीस माझ्यावरी सावली
स्पर्श तुझा अळुमाळू...
कुशीत घेई करडूस
करी स्तनपान अमृतधारेने
तो स्पर्श देई स्वर्गानंद
शेळीस मिळे उब वात्सल्याने
प्राणी असो की नारी
हे भाग्य जिच्या भाळी
विश्वात थोर ती जननी
जी आहे लेकुरवाळी..।।
सौ. कल्पना देशमुख
धाराऊ ग तूच माझी
तूच माझी माऊली
अंगावरी उन्ह झेलून
धरलीस माझ्यावरी सावली
सौ.चंदना उतेकर
स्तन्य तुझे जीवन माझे
जगण्याला बळ ते देते
जीवनरस तव सर्वस्वाने
तन मन माझे साकारते
क्षुधाशांतीस्तव त्या अमृतधारा
ईश्वरे दिधल्या तुझ्या स्तनाला
बळ बुद्धी तव अवघे अर्पून
आकारिसी तू मम जीवनाला
पशू पक्षी वा मनुष्यप्राणी
विविधता ती चराचरातूनी
ह्रदय मातेचे एकच दिधले
सृजनाचा आनंद जीवनी.
सौ स्मिता परदेशी.
जगण्याला बळ ते देते
जीवनरस तव सर्वस्वाने
तन मन माझे साकारते
क्षुधाशांतीस्तव त्या अमृतधारा
ईश्वरे दिधल्या तुझ्या स्तनाला
बळ बुद्धी तव अवघे अर्पून
आकारिसी तू मम जीवनाला
पशू पक्षी वा मनुष्यप्राणी
विविधता ती चराचरातूनी
ह्रदय मातेचे एकच दिधले
सृजनाचा आनंद जीवनी.
सौ स्मिता परदेशी.
वात्सल्य
वात्सल्याचे मूर्तीमंत रूप
आभाळमायेची सावली
स्तनपान अमृतधारेने
लेकरांस मिळे संजीवन
माऊलीच्या कुशीत
वात्सल्य, सुरक्षितता
देवाहूनी थोर
मायमाऊली जननी.....
आभाळमायेची सावली
स्तनपान अमृतधारेने
लेकरांस मिळे संजीवन
माऊलीच्या कुशीत
वात्सल्य, सुरक्षितता
देवाहूनी थोर
मायमाऊली जननी.....
सौ.ऋतुजा गवस.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment