मैत्री

शुभांगी कदम

त्याच्या यादीत असो नसो
तरी आपण मात्र सोबत जावं
सुख दुःखाला पदोपदी
त्याच्यासोबत वाटून घ्यावं

अनाम नितळ तो समान धागा 
बांधून घ्यावे हाती कंकण
बनून सावली छत्र धरावे
नको दुरावा एकही क्षण

दोन शरीरे दैवी योजना
अनुभूतीची एक भावना
रक्त नाही,नाही नाते
नाही कुठले स्वार्थी बंधन
या हृदयीचे त्या हृदयी
'मैत्र जीवांचे' परिमल चंदन

आयुष्यातला 'शून्य' सखा
तू सोबत असता 
मी भाव चढा
कणखर पोलादी
सतत सोबती 
प्रेरक माझा तू सह्यकडे
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

सौ.ऋतुजा गवस(गीता)

मैत्री असावी निखळ पारदर्शी
त्यात नसावा कुठलाच स्वार्थ
मैत्री ऋणानुबंधाची रेशीमगाठ
रेशीमगाठीची विण विश्वासाची

मैत्री श्रीकृष्ण सुदाम्यासारखी
त्यात नसावा भेदाभेद ,मत्सर
त्याग स्नेह सौहार्दभाव असावा
निशब्द भावनांची उकल व्हावी


मैत्रीत असावा सुखद विसावा 
असावी उत्तम विचारांची जोड
मैत्रीत दुनियादारी न येता
असावी फक्त दिल दोस्ती यारी


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र