शब्द- क्षण
शब्द- क्षण
अस्मिता भस्मे
कातरवेळी नकळत एक क्षण
वेचूनी आला भूतकाळतील ते सोनेरी क्षण
हरवून गेले त्यामधे हे वैरी मन
भाबडी आशा फिरूनी येतील का हो तो क्षण
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
.
चंदना उतेकर
आळवावरचा प्रत्येक थेंब
मनभरून जगायला शिकवतो.
क्षणभंगूर असला तरी
हिऱ्या प्रमाणे चमकायला शिकवतो.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अंजली जोशी
अखंड,अविरत कलचक्राचा तुकडा एक क्षण
कधी सौख्य तर कधी दाह देई तो क्षण
सदाच आठवून फक्त सुखद ते क्षण
करू सोनेरी भविष्यातील सर्वच क्षण
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
शैलजा दीक्षित
जन्म-मरण यातील अंतर
राखुन ठेवतो एकच क्षण
कधी हसवतो कधी फसवतो
कधी तारतो एकच क्षण
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
सुनंदा
आला क्षण गेला क्षण
असे का म्हणता फुका
क्षणभंगूर जीवनाचा
आस्वाद मनसोक्त लुटा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
ऋतुजा गवस
जीवन आहे क्षणभंगुर
त्याला बनवा सुमधुर
क्षण अन क्षण निसटतोय
हृदय पटलावर सामावतोय
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्वाती वामन
एक दिवस जीवन असणारे फूल क्षणभर का होईना
आसमंत सुंगधित करते
दीर्घकाळ जगणाऱ्या माणसाकडून निसर्गाने किती अपेक्षा कराव्यात
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
नीता धोडपकर
क्षणावरची चारोळी
एका क्षणात रचली
दुसरा क्षण येताच
त्याच क्षणी विसरली !
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
चंदा वाडकर
क्षण तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचा
धुंद मनाला मोहरून टाकणारा
क्षण आता तुझ्या वैराण विरहाचा
माझं तनमन झुरवून टाकणारा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्मिता परदेशी
किती वर्णने किती कल्पना
किती पंथ अन् किती साधना
अनुभूतीचा पुरे एक क्षण
चराचराच्या परिपूर्ण ज्ञाना.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दकविता
Comments
Post a Comment