घरटे
नीता धोडपकर
माझे असे बांधिले
जमवुन काडी काडी
जोडीदारही सोडून गेला
अर्धी होता माडी
आप्तजनांच्या साथीने मी वाढविले पिल्ला ,
झाला जरी उशीर सख्यांनो,
धरु नका अबोला !
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
शैलजा
अरे माणसा घरटे माझे
इकोफ्रेंडली आहे पाहा
काड्या काड्या जोडुन केले
सुबक छानसे अहा अहा
तू रे माणसा करतोस काय?
घातक जीवन जगतोस खूप
घरकुल तुझे बांधण्यासाठी
बुजवुन टाकतोस नद्या नि कूप
तुझ्या अशा या जगण्याने
पर्यावरणा धोका होई
माझे घरटे खूपच छान
फांदीवरती झोका घेई
इकोफ्रेंडली माझे घरटे
झुलत राहते दिवस-रात
धोका नाही कुणास काही
न्यारीच आहे याची बात
जागा होरे तूही माणसा
निसर्ग सारा जपून ठेव
वाढवताना इमारती तू
आमचे देखील भान ठेव
नकोस तोडू वने जंगले
घरकुल तुझे बांधताना
कंठच दाटुन येतो माझा
तुला आज हे सांगताना
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
वंदना नागरगोचे
खोप्या मधी खोपा ग
सुगरणीचा खोपा ग
बाभळीच्या झाडावर
विण-विणते झरझर
शोधती काड्या-कुडया
जमविती संसाराला
हळूहळू पिलासाठी
बनविती कापसाची लादी
ऊन-पाऊस लागु नये
अखंड गवसत फिरती
पावसाच्या आगुदर खोपा
तयार करिती
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्मिता परदेशी
इवलंस घरटं
भावविश्वानं बांधलेलं
त्यात माझं अवघं
विश्वच सामावलेलं
इवलंस घरटं
पिलांना सांभाळतं
तेच उंच झेपावण्याचं
बळ त्यांना देतं
इवलंस घरटं
जगापासून सांभाळतं
अन् जगाला हाताळायचं
बळही तेच देतं
माझं घरटं
इवलंस दिसतं
पण आकाश पेलण्याचं
बळ त्यात सामावतं..
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
Comments
Post a Comment