धुके

धुके


स्मिता परदेशी

तुझ्या बरसण्याच्या आसेने
बघ डोळे सुद्धा तहानलेत आता
नुसतेच निरोप
काळेकभिन्न
कधी येशील तू स्वतः?

असमंतात अधीरता
तुला झेलून घेण्याची
लतावेलिंमध्ये चढाओढ
मिठित तुझ्या येण्याची...

तलावाचे गीत अधूरे
तरंगांच्या नादाविना
मृद्गन्ध ही शोधे इथे
तुझ्या ओलेत्या खुणा..

वठलेल्या जीर्ण मनी
हिरवे कंच धुमारे
मन भरलेले तव
कर रीते या माहेरी पुन्हा रे..

नवचैतन्याचा वसा तुझा
का भिजूनही तू थिजलेला
श्रृंगाराचा अंगार धरेचा
तुझ्याविना विझलेला..

पूरे आता रुसवे फुगवे
ये भेटू आवेगाने
सृजनाचे मिलन होता
बघ रुजेल हिरवे गाणे...

शुभांगी कदम

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अपर्णा आंबेकर

एकच प्याला हाती आला

कॉफ़ी वाफाळलेली ल्याला

कडू चवीची बीन साखरेची
पण सख्यांसवे अमृताचा प्याला

मेघ गर्जण्यास तयार zaala
वीज जोडीला लखलख न्यारा
थेंब टपोरे चमकणारे
मोत्यासही टक्कर देणारे

अलगद आला  बरसला सावन
समीर अधीर घाली आलिंगन
रसरसलेल्या वृक्षान्वरती
किलबिल पक्षी मधुर गाती

धरित्री सुंदरतेने सजलेली
हिरवी शाल पांघरलेली
लाल पिवळ्या फुलांच्या माळा
गळा तिचा दिसे साजिरा

चहुकडे गर्द हिरवे गालिचे
नभापर्यंत पसरलेले
त्या सुंदर गालीच्यावरती
टपटप मेघ बरसू लागती

तृप्त मनाने निसर्ग बघताना
आठ्वणींचा पट गहिवरतो
मधुर कॉफ़ी मग हाती धरताना
कुंद हवेत धुन्द क्षण होतो
कुंद हवेत धुन्द क्षण होतो

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

वृषाली गोखले

धुके

धुक्यातली अद्भुतता अज्ञाताच्या प्रांतात नेते
धुके ओसरल्यावर मन भानावर येते

धुक्याने वेढलेल्या  निसर्गाचे रूप हृदयात भरून रहाते
नितळ पाण्यात धुके मिसळून जाते

धुके ओसरल्यावर निसर्गाचे निर्मळ दर्शन होते
धुके आभासी नाही,हे समजते
धुक्यामुळेच सृष्टीचे चैतन्य अबाधित राहते

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
सविता करंजकर

वारा घालतो फुगडी.. वेली-पानाफुलातून..
रिमझिम  पडतो पाऊस ..थेंबाथेंबातुन...

जणू काळा कापूस पिंजला..धुक्याने आले अंधारून....
वीज नाचते नभात..कस्तुरी गंधाळते मातीतून...

लेवून सोनेरी किनार मेघ आलेत भरून...
ढोलताशे बडवित गर्जत राहती आकाशात...

जशी लेकरास आशा लागते मातेची..
तशी पावसाची आस इथे लागली मातीस...

येता बेधुंद  पावसाची सर..
गेला आसमंत न्हाऊन..
धरा जाहली पोपट..
लेणं हिरवाईचं लेवून...

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अपर्णा आंबेकर 

काळोख का धुके नक्की काय??

एक चमत्कार निसर्गाचा
दुसरा मळभ मनावरचा

एकाला कश्याचीच नाही तोड
दुसर्याला अहंकारची आहे जोड

एक  दाटून दाटून  मोकळे होणार
दुसरे मात्र साचून साचून दाट होणार

एक अंधार तरिही आशा प्रकाशाची
दुसरा अंधार तरिही भिती गुढतेची

एक  झाकोळला तरिही साकार
दुसरे झाकोलून निरथक आकार

व्हावा सर्वत्र हलका शिडकावा

साफ व्हावा काळोख आणी
धुवून निघावे सर्व मळभ

मोकळे होईल मग आभाळ
कोसळतील नसानसातून धारा

गात्र होतील मग मोकळी
आसमंत फ़ुलून येईल सारा

तलाव होईल निवांत
शांत शांत  तो किनारा
शांत शांत तो किनारा

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

वृषाली गोखले

झाड एकले उभे असे ते गोल तळ्याकाठी,
आसुसले ते,हले-डुले हो
पाऊसधारांसाठी!

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
 वंदना नागरगोचे

पांढऱ्या शुभ्र तलावावर
काळ्या ढगांची सावली
वारा असा फिरे
मन मोहून जाई
क्षणात विज कडाडे
जिव घाबरून जाई
मन किती चंचल
वारा, पाऊस हवा
परी काळे ढग नको
वंदना नागरगोजे
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अस्मिता भस्मे

धुंद हा आसमंत....
बेधुंद हा पवन....
सुगंधित आठवांनी....
दरवळून गेले मन... 

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

सौ स्मिता परदेशी    

भरलेलं आभाळ
आतुर सृष्टी....
व्याकुळ मन
व्याकुळ दृष्टी...

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र