कोरडी विहिर


 शुभांगी कदम 

 कोरड ठक्क रूप तुझं
नक्कीच नव्हतं कधी
कधी तुझ्या पोटात
नांदायची इवलुशी नदी...

कुठे गेले आता सारे
स्वयंभू उमाळे
कोरडेपणा तुझा
आणि माझे मन जळे...

आटलीस बाई तू
की आटवले तुला
बोर मारून टाक्यांमध्ये
साठवलय तुला...

कधी समृद्धीची फिरायची
तुझ्यावर रहाटी...
आता म्हणे शाप तुला
तू गं वांझोटी...

तुझ्या काठांवर कधी
जीव तृप्त व्हायचे
किलबिल फांद्यांवर
आणि मुके जीव न्हायचे...

आला गेला वाटसरू
आशीर्वाद दयायचा
उरभरून ओलावा
तुझ्यातला प्यायचा...

धुणी भांडी कधी
कधी दुखणी गाऱ्हाणी
आता उजाड सारं
अन सोबत विराणी...

डोळेभरुन माझे
सखे तुझी वेणा
सांग मला तू
भरून वाहशील का पुन्हा?
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

शैलजा

विहिरीचं पाणी आहे आटलेलं 
डोळ्यात पाणी आहे साठलेलं
ढगातल्या देवा बरसुदे पाणी
माझं शिवार आहे फाटलेलं

विहीरीला फुटुदे खळखळता झरा
मळा फुलुदे धान्याने सारा
कृपा ईश्वरा अशी काही करा
मायेची बरसात माझ्यावर धरा

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र