दीपमाळ
वृषाली गोखले
राऊळी कला अवतरली
दीपमाळ ती झगमगली
कैक वर्षांची दीपावली
मंदिराची श्रीमंती वाढली
ती चैतन्याने निनादली
शाश्वत ओजे स्थिरावली
नभात शक्ती एकवटली
विश्वशक्ती अवतरली
मंदिरे उदंड दुमदुमली
ती प्रांगणे तेजाळली
भक्तांची मने आसुसली
देवनगरी आनंदली
दीपमाळ सज्ज झाली
भक्तांची जमे मांदियाळी
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्मिता परदेशी
उंच नभांतरी दीपमाळ ही
उजळण्या अष्टदिशा खरी
तेजोमय तो प्रकाश उधळीत
आत्मोन्नत्तीचा मार्ग अंतरी
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
वंदना नागरगोचे
किती सुंदर ग माझी दिपमाळ
तुला पहाताच पुनवेची याद येई
पुनवेला दिव्यांची थोडी आरास होई
अंबाईच्या त्रिपुरी पुनवेला दिव्यांची रोषणाई होई
भक्त जन हजेरी लावी
दिपमाळ बघण्यासाठी, दर्शनासाठी
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अपर्णा आंबेकर
उंच भरारी गगनी घ्यावी
तरी भुमिवर पद स्तब्ध असावी
स्व :प्रकाशाने धरित्री उजळावी
तरी माणुसकी ना कधी विसरावी
दिपस्तंभ शिकवणी घ्यावी
जगण्यास नवी उमेद मिळावी
जगदंबेच्या कृपाप्रसादाची वृष्टी
जीवनात शत जन्म असावी
क्षितिजापर्यंत दृष्टी जाता
काही मजसी दिसले नाही
कवेत जीव माझा होता
आनंदाश्रू नयने वाही
अश्रुंनी त्या भरला सागर
रवी वाकुनी तत्पर पाही
गगनही ठेंगणे झाले तेव्हा
आलिंगन तू मजसी देई
अमोल ठेवा जीवनातला
प्रकाश सभोवर त्याचा पड्ला
केशरी पिवळा हलका करडा
गालिचा मग नभी अंथरला
ठेव ही परम सुखाची
लाभो प्रत्येकाला जीवनी
प्रभू चरणी एक मागणे
ना पाहिजे दुसरे काही
🌹अपर्णा 🌹
Comments
Post a Comment