शब्द- गंध मातीचा

शब्द- गंध मातीचा

शैलजा

पहिला रिमझिम पाऊस येता
गंध मातीचा दरवळतो
मेघांचा धरणीशी बघ ना
कोमलसा धागा जुळतो
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

नीता धोडपकर

गंध मातीचा धुंद असा हा 
बहर जणू अपुल्या प्रीतिचा
मस्त असा हा दरवळे दाही दिशा
आसमंती जणु दरवळे धुंद नशा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

नीता धोडपकर

गंध मातीचा धुंद असा हा 
बहर जणू अपुल्या प्रीतिचा
मस्त असा हा दरवळे दाही दिशा
आसमंती जणु दरवळे धुंद नशा 

गंध मातीचा जाणवे जेव्हा
काळजी घे जन्म पुन्हा पुन्हा
पावसाच्या तुफान हाती 
न लागो कधी माझा तान्हा !
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
      
चंदा वाडेकर

गंध मातीचा  मन मोहरून गेला
तुझ्या माझ्या प्रीतीचा बहर फुलला 
तुझ्यासवे जगण्याचा अर्थ समजला.
गंध मातीचा कायम ह्रदयात दाटला
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

शैलजा

अत्तराच्या दुकानात शोधले फार
सुगंध भरेना कोणताच मनी
बाहेरून आला गंध मातीचा
असे अस्सल अत्तर बनवले कुणी?
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अंजली जोशी 

सृजनाचा हुंकार असतो मातीचा गंध,
किमती अत्तरहून ही मोहरवतो अंग,
तप्त उन्हाचा जेव्हा सोसते धरणी संग,
नवनिर्मितीची चाहूल उधळतो 
पहिल्या शिडकाव्या संग.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अस्मिता भस्मे 

अहाहा!! गंध मातीचा... 
याची तुलना न कोणासवे....
जणू भावबंध तुझ्या माझ्या प्रीतीचा....
त्यात मिसळून दरवळे...
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾        

स्मिता परदेशी

गंध मातीचा धुंद प्रीतीचा
तो सृजनाचा नव निर्मितीचा
अविष्कार तो निसर्ग शक्तीचा 
मृद्गंध  उधळतो विश्वात चेतनेचा.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

चांदना उतेकर  

ओल्या स्पर्शानेच तुझ्या 
जीवनास अर्थ आला.
मिलनाने तुझ्या नी माझ्या
मृद्गंधाचा जन्म झाला.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र