विठ्ठल

शुभांगी कदम

जो-तो शोधे
विठ्ठल आपुला
ठायी ठायी आहे
त्याचा वास..

रोजचीच देवा
आषाढी-कार्तिकी
चराचरी सकळ
माउली दिसे..

ज्याचा जैसा रंग
त्याला तैसा संग
रुपे मनोहर
घेई ऐसे..

विठ्ठला तू पाणी
सुखे गाई वाणी
अवकाश व्यापे
माय रुक्मिणी..

एक नादब्रह्म
सदा येवो कानी
अवघी पंढरी
विठुमय..

ज्याला त्याला भेटो
विठ्ठल मनीचा
तगमग सारी
विझूदेगा..

आगे विठाबाई
माय रखुमायी
दिसू देगा डोळा
संसार सुखाचा.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

ऋतुजा गवस 

 विठ्ठल

पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला |
टाळ मृदुंगाला | आनंदला||१||

संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी |
जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२||

एकोप्याची वारी| वारकरी दंग |
भजनात गुंग | भक्तगण ||३||

शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी|
घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४||

शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा |
करण्यास सदा | उपकारी||५||

दर्शनाची आस | मन घाली साद|
माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६||

जोडूनिया कर | हिच विनवणी |
रहावी धरणी | आनंदीत ||७||
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

अस्मिता भस्मे

ज्यांनी घेेतला माझा ध्यास ...
मी आहे तयांच्या आसपास...
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
           
स्मिता परदेशी

 धन्य धन्य तो विठ्ठल 
धन्य धन्य ती पंढरी
पहा जिच्या भेटीसाठी 
ओसंडली ही नगरी

समचरण पहाया 
विवेक लागतो धराया
मीपणाची ती जाण
विठूचरणी वहाया

रंग काळा त्या विठूचा
कळिकाळा लोटी दूर
भाव भक्तीचा कल्लोळ 
विरक्तीला आला पूर

विठू आले रे सारून 
गणगोत पाश माझे
उरी भेटली पंढरी
तुझे कुशल उमजे

आता फिरते माघारा
घेई माझा दंडवत
नुरे रूप गुणाची ती चाड
हेच वारीचे फलित.....
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

 वृषाली गोखले 

नादसोहळा

संतांची मांदियाळी जमली त्या राऊळात,

पाहिली,अनुभवली भक्ती,नामगजरात,

राऊळाच्या हरेक कमानीतून,
आकाश एकत्वाने भारित निर्गुण,

ते सनातन विश्वदर्शन
नादमय ते नामसंकीर्तन,

हृदयाकाशी भरून राही,
भक्तिविण संसार नाही,
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

वंदना नागरगोचे

 शिल्पकार जस जसा आकार करिती
तस तसा माझा विठू नजरेस
पडती
कधी आकार पूर्ण होई
तळमळ माझ्या जीवाला लागी
देवशयनी ला विराजमान होताच
सारा गाव आनंदाने नाचती
जय हरी विट्ठल
जय हरी विठ्ठल

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र