शब्द- धुंद हवा

शब्द- धुंद हवा

 कल्पना देशमुख 

(अष्टाक्षरी रचना)

सांजवेळी साद घाले
मनातील भाव फुले
धुंद हवेतील  गंध
पाहुनिया तन झुले ।।

धुंद हवा स्पर्शुनिया
मम काया शहारली
हुरहूर वाटे जीवा
लाजुनिया बावरली ।।

निशाराणी खुणावते
गाते प्रीतीचा मारवा
मिट्ट काळोखात सखी
लपे मिठीत चांदवा ।।

धुंद हवा चहूकडे
धुके दाटले क्षणात
भाव नाचरे बिलोरे
ओढ बेबंद श्वासात ।।
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

स्मिता परदेशी

 अष्टाक्षरी रचना

धुंद गंध हा सुगंध 
दरवळे आसमंत
भान हरपूनि सख्या 
भरून घे हवा धुंद 

वारा मंद तारे मंद
भोवताल धुंदफुंद
सोबतीने प्रियतमा
निसर्गही अनिर्बंध

ग्रीष्म आणतो वसंत
स्पर्श होता मृदू संथ
भाव दाटतो मनात
जणू पसरे मृद्गंध. 
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾    

चंदा वाडकर

धुंद हवा जीव फुले
दारी पारिजात डोले
गंध चहू दरवळे
मन सुगंधी जाहले
      
गारवा झुळूक गडे
प्रीतीला उधाण आले
रोमांच अंगी फुलले
प्रणया आतुर झाले

सजूनी मग बैसले
ओठ मिटूनी घेतले
स्वप्न अधुरे प्रीतीचे
एका क्षणात भंगले
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

नीता धोडपकर 

धुंद हवा गुंग मती
मंद गती येत सखी
छुमछुम पैंजणांचा
नाद नित मज रोखी !
        
अवखळ अलगत
गाली येत बट खुळी
अनुरागी त्या साजाचा
नाही गर्व तिज मुळी !

नयनांची मधुभाषा
सांगे मज गुज उरी
नाही किती वदलासी
मीच सखी तुझी परि!
 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शब्दकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र