चंद्र चांदणे
अनंताकडे प्रवास
पूर्णत्वाची ओढ लागे जिवा!
नश्वरतेच्या विळख्यातून वाचव रे दैवा!
नभीचा तो अद्भुत नजारा पहातच रहावा!
शांततेत आत्मा सृष्टीत विलीन व्हावा!
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अस्मिता भस्मे
नाभोमंडपी पाहता या कांतीमय रजनीनाथास....
मोहरूनी गेले मन क्षणार्ध झाला तुझाच भास....
मोद भरूनी गेली मनी ही
भूवरील लखलख दिव्यांची आरास....
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अपर्णा आंबेकर
चहुकडे मंद पसरला
तारांगण भारूनि राहिला
काजव्या सम लकलकला
हलकेच चंद्रमा दिसला
झाकोळला परी तिमीर हसला
मानाने नभांगणी प्रसवला
रात्रीचा राजा चमकला
गर्वाने गगनी परतुनी आला
ना सूर्य ना धरित्री
ना मेघ ना सावित्री
दृढनिश्चय असे जेव्हा
यशवंत व्हाल तेव्हा
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
स्मिता परदेशी
प्रसन्न वदने शशि चालला
गुरूदक्षिणा अर्पण करण्या
तेजःपुंज परि शीतल आभा
दिमाखात ती नभा दाविण्या
प्रदक्षिणा ती संपन्न करूनि
गुरुकृपेचा प्रसाद लेवूनी
पादाक्रांत जणू भूमातेचे
कलेकलेने विश्व उजळण्या....
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments
Post a Comment