कुलूप
नीता धोडपटकर
बंधमुक्त मी , मज न ठावे
कधी कुठे ते रुजावे
मिळता फुरसत, आणिक रुजवत
ईशचरणी ते बहरावे !
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
शैलजा
जन्माचे कारण शोधील कोण?
देवाची करणी जाणील कोण?
जुनाट कुलपात जन्मुन आला
तरूस आता सांभाळील कोण?
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
चंदा वाडकर
बंद कुलुपात जिणें माझे बहरत आहे
बियाणे मी रुजणे मज ठाऊक आहे
प्रतिकूल परिस्थितीत बहरणे मज पसंत आहे
इवलेसे रोपटे जरी मज जगण्याची आस आहे.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
अंजली जोशी
गंजलेल्या कुलुपावर इवलसं रोप तरारलं,
रुजलं च ते जरा ओलावा मिळाल्यावर,
ना चिंता ना भीती असे
कदा अंकुरण्या वर
हे च सांगे हा सळसळता कोवळा हिरवा बहर
चैतन्या ची अशीच उधळण राहो या चराचरावर.
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
ऋतुजा गवस
बियाणे रुजावे जसे
माळरानी खडकाळ
तसे रोप उगवले
गंजलेल्या कुलूपावर
निसर्गाची करणी
मानवाला अनाकलनीय
तरी मौलिक संदेश
प्रतिकूलतेतूनी बहरण्याचा
करूनी संकटावर मात
मी बहरणार,उभे राहणार..
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
शुभांगी कदम
एकच ठावे मजला
रुजणे आणिक झिजणे
करू कशास विचार
कशास म्हणती विझणे..
आधार असो मातीचा
की गंज तळाशी माझ्या
मी रूप त्या ईशाचे
स्वअस्तित्वाचा राजा..
मी जाणितो कर्माला
फुलण्याच्या या धर्माला
बहरावे उमलुनी यावे
यावे पुन्हा पुन्हा जन्माला..
प्रसववेदना त्याला
ज्याला जगण्याची गम्मत कळते
रडणाऱ्या प्रत्येकाचे
जगणे तिळतीळ हो जळते
मी मुक्त मनोहारी
चैतन्याने भरलेला
कोंब जरी मी इवला
विश्वापसरा उरी मी धरीला
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
Comments
Post a Comment