कमान


चित्र-कमान
सविता करंजकर
निळे पाणी निळे आकाश
निळा भवताल सारा..
दूर कमानीतून पहा
गुपित सांगतो वारा...
गगनाला जाऊन भिडले
गडद निळे पाणी..
वारा गाऊन गाणी
सांगे आगळी  कहाणी..
डोंगरांमधुनी धावती
पाण्याचे निळसर पाट
डोळ्यांमधे साठवून ठेवू
निसर्गाचा हा थाट..
हिरवाईने सजली..
भवतालची धरणी..
जणू पांघरली तिने शाल
ही निसर्गाची गूढ करणी...
चंदना कैलास उतेकर
सृष्टी म्हणजे जणू चित्र
भासे खुल्या गवाक्षामधून
मीही होते शांत स्तब्ध
ऐकण्या निसर्गाची काव्यधून
स्मिता परदेशी
निळ्या निळ्या या नीलमण्याला
कृष्णरंग हे शोभे कोन्दण
प्रातःकाली ऊन कोवळे
उजळून टाकी सारे नभांगण
झुळझुळणारे जल हे सुंदर
गवतफुले ती डोलती अंतर
अहा!.. पहा हे हिरवे डोंगर
आकाशाशी गुज निरंतर
सृजन हे अवघे या विश्वाचे
प्रसन्न चित्ते घडवी तो पिता
चित्र देखणे महिरप करतो
मनूकरिष्मा सारे पहा.
          
मिनू गांधी
नदी झुळूझुळू वाहे
कशी दऱ्यात खोऱ्यात
आकाशी पाखरे उडती
तिला पहात पहात
दाटी हुरहुर माझ्या मनात मनात
कशी सांगु सख्या तुझ्या कानांत कानांत
वृषाली गोखले
कमानीतून,समोर पाहिले,
सृष्टीचे रुप,दृष्टीत सामावले!
डोंगररांगा हिरवाईच्या,
ग्रामबाला नदितीरीच्या
आठवणी त्या इतिहासाच्या,
जागल्या गाथा शौर्याच्या!...१
लाल,लाल मातीच्या
निळ्या निळ्या नभाच्या
झुळ झुळ पाण्याच्या!
अनंत,अगणित छटा सृष्टीच्या,
कोंदणात ठसल्या नयनांच्या!..2
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र