आकाशातील गर्द ढग

चित्र-आकाशातील गर्द ढग
वृषाली गोखले
जलद भरून आले
नभाकाश जलद वर्षतील धारा
ओलेती होईल वसुंधरा!
दीपा ठाणेकर
चिमणी चिमणी पाणी दे
कावळ्या कावळ्या वारा दे
या ओळी गात गात
पाटीला काळंकुटट करून
शिक्षणाचा श्रीगणेशा
गिरवणारी पिढी झाली गतकालीन...
नव्या को-या पुस्तकात स्वत:ला आणि शिक्षणाला शोधणारी स्मार्ट
पिढी तयार होऊ पाहतेय
जगाच्या स्पर्धेसाठी...
जिनं ए फाँर अँपल
बी फाँर बिग बाझार पाहिला आणि अनुभवलाही...
चिमणे तुझ्या एस फॉर स्पँरो पर्यंत येण्याची गरज कधी वाटलीच नाही मुलांना...
कारण त्यांची स्पँरो
त्यांनी चिवचिवतानाच पाहिली...
इंग्रजीत त्या चिवचिवीला  काय म्हणायचंय...?
तेच न उमगल्यामुळे
ते करू लागले पोपटपंची  एस फॉर स्पँरोचीच....
चिमणे दोष मुलांचा नाही गं..
कुठंतरी आम्हीच चुकलो,
तुझा चिवचिवणं,  अनुभवणं ,
तुझं बोलणं ,
निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर तिथल्या भावंडाना ओळखायला,
समजून घ्यायला लागणारी संवेदनशीलता नाही शिकवता आली मोरल व्ह्यालुजमधूनही..
इतकंच काय आम्ही
आमच्या घरातल्या चिमण्यांचा आवाजही दाबून टाकला भ्रूणहत्या करून...
जागतिक चिमणी दिनाच्या
शाब्दिक चिवचिवीतून शुभेच्छा....
सविता गणेश
कधी कातर काया .....कधी निळसर माया ....मोही मना ही धुसर छाया
चातक झाली रे ही अवनी...हळुच दे सारुनी निळाई....रविलालीमा शोभु दे अंगणी.....
सविता करंजकर
चिऊताई चिऊताई अंगणात येत रहा...
चिवचिवाटानं अंगण खुलवत रहा..
चिऊताई चिऊताई अगं तू येत रहा...
बीजं नवनवीन रूजवत रहा...
रुजलेली बीजं अंकुरतील..
झाडं फळाफुलांनी बहरतील...
त्या झाडांवर नवनवी घरटी बनवत रहा...
चिऊताई चिऊताई तू येत रहा..
आम्ही ही तुझं स्वागत करु..
तुझ्या दाणापाण्याची सोय करू..
सिमेंटच्या जंगलातलं तुझं घरटं आम्ही जतन करू..
चिऊताई तुला कवितांमध्ये पुस्तकात कोंडणार नाही..
चिऊताई तू येत रहा..
आमच्या पुढच्या पिढीला घास भरवायला.चिऊताई , तू येत रहा..
स्मिता परदेशी
नभांगणी या दाटून आली
गर्दी मेघांची
दृश्य पाहण्या लगबग झाली
त्या रविकिरणांची
कृष्णमेघ हे आतुर झाले
वसुंधरेची लगबग चाले
रविकरही झाकोळून गेले
नभांगणाला व्यापून राही
प्रभा तरी त्यांची
आकाशीचे रम्य तेज ते
गर्भिणीचे जणू सोज्वळ रूपडे
गर्भभार पेलूनही हसरे
आतुर सृजना झाले...
       
कल्पना देशमुख
कुंदावल्या आकाशात
रवि झाकोळून गेला
वारा थैमान घालतो
सरी मोत्याच्या ग आल्या
        
          
सविता करंजकर
नीलनभाच्या प्रांगणात
आज नवे काही घडले...
धुंद सायंकाळी
आभाळाच्या डोळ्यात
जणू धुके दाटले...

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र