ताडगोळा
द्विदल रसरशीत हे फळ
कधी आंबट कधी गोड..
कधी आंबट कधी गोड..
रुप पाहूनी भासते
ह्रदय कुणाचे की हसते कुणी गोड....
ह्रदय कुणाचे की हसते कुणी गोड....
- सविता कारंजकर
ताडगोळ्याचे मनोगत
शहाळे म्हणते मीच महान,
उन्हाळ्यात छान भागवतो तहान,
चव माझी कशी चाखुया छान,
मूर्ती लहान,पण कीर्ती महान,
उन्हाळ्यात छान भागवतो तहान,
चव माझी कशी चाखुया छान,
मूर्ती लहान,पण कीर्ती महान,
वृषाली गोखले
गोड ताडगोळा भागवतो तहान
लांबट तो गोल मोती छान
जशी,देवाची करणी नारळात पाणी
तशी,ताडगोळ्याची मधूर करणी
शहाळे म्हणते मीच महान,
उन्हाळ्यात छान भागवतो तहान,
चव माझी कशी चाखुया छान,
मूर्ती लहान,पण कीर्ती महान,
लांबट तो गोल मोती छान
जशी,देवाची करणी नारळात पाणी
तशी,ताडगोळ्याची मधूर करणी
शहाळे म्हणते मीच महान,
उन्हाळ्यात छान भागवतो तहान,
चव माझी कशी चाखुया छान,
मूर्ती लहान,पण कीर्ती महान,
वृषाली गोखले
हिरवा रेशमी शेला पांघरून
गर्द पिवळी पैठणी लेवून
आंबट-गोड मुखी विडा धरून
नववधू पहा ही गेली बावरून!!
गर्द पिवळी पैठणी लेवून
आंबट-गोड मुखी विडा धरून
नववधू पहा ही गेली बावरून!!
मृणाल पाटोळे
पाहून रूप गहुवर्णी
भाळले बहू मजवर्ती
मी मधुर आगळा वेगळा
होती फिदा मजवर कैक वेळा
भाळले बहू मजवर्ती
मी मधुर आगळा वेगळा
होती फिदा मजवर कैक वेळा
मेधा गोडबोले
मोरपंखी ही करुनी उधळण
त्यावरी केशरी सदे शिंपवून
लाजरी साजरी धरणी दिपवून
अशा भारतीस हे पहिले वंदन .
त्यावरी केशरी सदे शिंपवून
लाजरी साजरी धरणी दिपवून
अशा भारतीस हे पहिले वंदन .
जहांगीरदार
भारतभूस जिने दाविले
संस्कारा या जिने दाविले
सुजाण मज जिने घडविले
मातेस मी या मनी पूजिले
संस्कारा या जिने दाविले
सुजाण मज जिने घडविले
मातेस मी या मनी पूजिले
नीता धोडपकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment