झाडावरील लटकलेला रंगीत पतंग
चित्र-झाडावरील लटकलेला रंगीत पतंग
सौ.चंदना कैलास उतेकर
नभी उंच उडण्याचा
उरे क्षणाचा रे खेळ
दोरी म्हणजे श्वास जणू
सरे आयुष्याची वेळ
उरे क्षणाचा रे खेळ
दोरी म्हणजे श्वास जणू
सरे आयुष्याची वेळ
सविता करंजकर
ऐक पतंगा,तुझी कहाणी
तशीच आमुची जिंदगानी
तव दो-यास काच लावता
झेप घेशी तू आकाशी
तशीच आमुची जिंदगानी
तव दो-यास काच लावता
झेप घेशी तू आकाशी
मनास आमच्या मिळता उभारी
जीवन घेई उंच भरारी..
भूतकाळात मनपतंग अटकता
क्षण सुखाचा होय फरारी..
जीवन घेई उंच भरारी..
भूतकाळात मनपतंग अटकता
क्षण सुखाचा होय फरारी..
आपटे अस्मिता
पतंग म्हणे , हे वृक्षा,
जाऊ दे मला आकाशी
इंद्रधनुचे रंग माझे ,
नभ घेऊ दे उराशी
जाऊ दे मला आकाशी
इंद्रधनुचे रंग माझे ,
नभ घेऊ दे उराशी
वृषाली गोखले
गाणे आनंदाचे,गुंजन पतंगाचे
स्पर्धेच्या वेगात झाला अंत जीवनाचा,
का मानवा रे करिसी,बेरंग जीवनाचा!
का मानवा रे करिसी,बेरंग जीवनाचा!
अडकसि तसाही नियतीच्या बंधनाने,
परि नच फससि कधीही
अपुल्याचि कर्माने!
परि नच फससि कधीही
अपुल्याचि कर्माने!
चला खेळ खेळू,रंगीत जीवनाचा,
नको बेरंग सारा,आनंद शाश्वताचा!
नको बेरंग सारा,आनंद शाश्वताचा!
मृणाल
रंग बरसती सात सुरातूनी
आकाशाच्या गाभाऱ्यातूनी
सप्तसुरांची घेऊनी साथ
सृष्टी आळवी मधुर गुणगान
आकाशाच्या गाभाऱ्यातूनी
सप्तसुरांची घेऊनी साथ
सृष्टी आळवी मधुर गुणगान
अंजली जोशी
झेपावला पतंग, मनी आभाळाची आसं,
सिमीत झेप तयाची
अडकला तो फांदीत
सांगे वृक्ष तयासी
शाश्वत सत्य एक
मनीच्या उमंगास आहे
सृष्टी नियमांचे कुंपण
सिमीत झेप तयाची
अडकला तो फांदीत
सांगे वृक्ष तयासी
शाश्वत सत्य एक
मनीच्या उमंगास आहे
सृष्टी नियमांचे कुंपण
सौ.चंदना कैलास उतेकर
उंच आभाळी हात मी लाविले रे
उडत्या पाखराचे पंख मी छाटले रे
तुटली दोरी, थांबले वाहते वारे रे
जिंकला निसर्ग,क्षणभंगूर उरलो मी रे
उडत्या पाखराचे पंख मी छाटले रे
तुटली दोरी, थांबले वाहते वारे रे
जिंकला निसर्ग,क्षणभंगूर उरलो मी रे
दीपा ठाणेकर
हिरवळीच्या देहावरी तुझी रंगपंचमी भारी,
आकाशाला भिडण्या तू
घेशी ललकारी,
तुझ्या भरारीला लाभे कसे
मानवी बळ ,
एक पतंग सोसे प्रेमापायी म्रुत्युची झळ....
आकाशाला भिडण्या तू
घेशी ललकारी,
तुझ्या भरारीला लाभे कसे
मानवी बळ ,
एक पतंग सोसे प्रेमापायी म्रुत्युची झळ....
मेधा गोडबोले
आज रंगतील, रंगवतील
होतील तुझ्या सम...
सगळीकडे भास तुझाच
मनात चिंतनही तुझंच
हा आनंद, हा ध्यास,
हा सप्तरंगी उत्सव तुझाच...
चराचरात जाणवेल अस्तित्व तुझं...
होतील आज सगळ्या राधिका ...
भिजतील आनंदात चिंब चिंब...
उधळली गुलाल सख्यावर...
गातील गीत उत्साहात...
होतील सगळे मदहोश...
रंगुनी रंगात सख्याच्या
धुंद होऊन डोलती....
राधे शाम होतील मग ...
राधे शाम होतील....
होतील तुझ्या सम...
सगळीकडे भास तुझाच
मनात चिंतनही तुझंच
हा आनंद, हा ध्यास,
हा सप्तरंगी उत्सव तुझाच...
चराचरात जाणवेल अस्तित्व तुझं...
होतील आज सगळ्या राधिका ...
भिजतील आनंदात चिंब चिंब...
उधळली गुलाल सख्यावर...
गातील गीत उत्साहात...
होतील सगळे मदहोश...
रंगुनी रंगात सख्याच्या
धुंद होऊन डोलती....
राधे शाम होतील मग ...
राधे शाम होतील....
दीपा ठाणेकर
ऋतूंप्रमाणे रोज नव्याने
हाक मारती आम्हा फळे,
आम्ही धावतो भलत्यापाठी
सात्विक खाणे का न कळे ?
हाक मारती आम्हा फळे,
आम्ही धावतो भलत्यापाठी
सात्विक खाणे का न कळे ?
टरबूज म्हणतो आलो मित्रा
घे माझा तू भरपूर स्वाद,
नकोच खाऊ काही बाही
नकोस भलता करूस नाद.
घे माझा तू भरपूर स्वाद,
नकोच खाऊ काही बाही
नकोस भलता करूस नाद.
रोज शहाळे हाका मारी
अमृत त्याच्या पोटाशी,
गाढ तृप्तता मिळते त्याला
बघा लावूनी ओठाशी.
अमृत त्याच्या पोटाशी,
गाढ तृप्तता मिळते त्याला
बघा लावूनी ओठाशी.
पपई म्हणे मी छान बहुगुणी
ठेव ध्यानी मी पाचक रे,
कशास खातो चूर्णे सोळा
खुशाल होऊन याचक रे.
ठेव ध्यानी मी पाचक रे,
कशास खातो चूर्णे सोळा
खुशाल होऊन याचक रे.
छान रसरशीत लिंबू म्हणतो
माझा ताजेपणा पहा,
लिंबूपाणी पी खुशाल अन
उत्साहातच न्हात रहा.
माझा ताजेपणा पहा,
लिंबूपाणी पी खुशाल अन
उत्साहातच न्हात रहा.
संत्री आणि मोसंबीच्या
मोठ्ठीच जादू अंगात,
मैत्री त्यांची सदा रंगवी
जीवन विविध रंगात.
मोठ्ठीच जादू अंगात,
मैत्री त्यांची सदा रंगवी
जीवन विविध रंगात.
पेरू, द्राक्षे, फणस नि बोरे
खुशाल खावी कैरी रे,
नकोच काही भलते सलते
आरोग्याचे वैरी रे.
खुशाल खावी कैरी रे,
नकोच काही भलते सलते
आरोग्याचे वैरी रे.
सफरचंद अन सीताफळाला
स्थानच देऊ या वरचे,
दोन काळजीवाहू आपले
मानु या त्यांना घरचे.
स्थानच देऊ या वरचे,
दोन काळजीवाहू आपले
मानु या त्यांना घरचे.
अननस, अंजीर, आवळा ही तर
अ दर्जाची छान फळे,
हातात घेता हात तयांचा
भयाण संकट दूर पळे.
अ दर्जाची छान फळे,
हातात घेता हात तयांचा
भयाण संकट दूर पळे.
केळी, कवठे, खजूर, खरबूज
जांभूळ सुद्धा खरे महान,
चिंचा करवंदेही खावी
होऊन जावे बरे लहान.
जांभूळ सुद्धा खरे महान,
चिंचा करवंदेही खावी
होऊन जावे बरे लहान.
आंबा हा तर राजा मित्रा
दे त्यालाही टाळी रे,
छान मांडली समोर प्रभूने
फळांची नैसर्गिक ही थाळी रे.
दे त्यालाही टाळी रे,
छान मांडली समोर प्रभूने
फळांची नैसर्गिक ही थाळी रे.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment