किल्ला आणि जेजुरी
किल्ला आणि जेजुरी
वृषाली गोखले
इतिहासाचे वैभव सारे
सुंदर शाश्वत किती अहा!
कमानीत हो सारे दडले सुंदरतेचे चित्र महा!
सुंदर शाश्वत किती अहा!
कमानीत हो सारे दडले सुंदरतेचे चित्र महा!
सविता करंजकर
रेखीव ही कमान
होती सज्ज स्वागतास...
छपराविना मज भासे
आज उदास उदास..
होती सज्ज स्वागतास...
छपराविना मज भासे
आज उदास उदास..
भेगाळल्या पहा भींती
व्यथा दुभंगल्या चित्ती..
हे छेद कसे सांधावे?
मुक्या जीवाने कसे सहावे?..
व्यथा दुभंगल्या चित्ती..
हे छेद कसे सांधावे?
मुक्या जीवाने कसे सहावे?..
उरी दडपला घाव आहे
श्वासातही धाप आहे
तरीही उभा असे मी
माझेच गीत गात आहे...
श्वासातही धाप आहे
तरीही उभा असे मी
माझेच गीत गात आहे...
वृषाली गोखले
हिरवेगार कुरणात दिसे हे वैभव खिल्लाराचे,
आनंदाने पाहू सारे सुरूप त्या हिरवाईचे!
कपिला गाई,चरति अन्न हे,अमृत आम्हा देती हो,
जतन करुया गोधन अमुचे, आपण सारे मिळुनि हो!
आनंदाने पाहू सारे सुरूप त्या हिरवाईचे!
कपिला गाई,चरति अन्न हे,अमृत आम्हा देती हो,
जतन करुया गोधन अमुचे, आपण सारे मिळुनि हो!
सौ.चंदना कैलास उतेकर
माझ्यावरती नाव काय करतोस?
इतिहासावर कोरून दाखव
सलाम ठोकतील पिढ्यानपिढ्या असा अजरामर होऊन दाखव
इतिहासावर कोरून दाखव
सलाम ठोकतील पिढ्यानपिढ्या असा अजरामर होऊन दाखव
वृषाली गोखले
मल्हारी देवा रे मल्हारी
अभूतपूर्व तव जेजुरी
तू राव~रंकाचा कैवारी
उधळत राहू हळद भंडारी
स्वार घोड्यावरती झाला
माझा मल्हारी,देव भला
जेजुरीचा राजा चांगला
मोद होई,सर्व भक्ताला
अभूतपूर्व तव जेजुरी
तू राव~रंकाचा कैवारी
उधळत राहू हळद भंडारी
स्वार घोड्यावरती झाला
माझा मल्हारी,देव भला
जेजुरीचा राजा चांगला
मोद होई,सर्व भक्ताला
सविता करंजकर
जगन्नियंत्याच्या
निळ्या छताखाली..
खंडेरायाची पाली
जणू पीतांबर नेसली...
निळ्या छताखाली..
खंडेरायाची पाली
जणू पीतांबर नेसली...
जयमल्हारच्या गर्जनेने
अवघी नगरी दुमदुमली...
आराध्याच्या दर्शनासाठी
भक्तमंडळी आतुरली....
अवघी नगरी दुमदुमली...
आराध्याच्या दर्शनासाठी
भक्तमंडळी आतुरली....
वृषाली गोखले
राव खंडेराया, तुझा इतिहास वाचावा
भक्तांनी शौर्याचा महिमा गात रहावा
शिवतत्त्व शुभ,शुभ असे
मल्हारीचे,रूप मनी ठसे
ते भारीच आहे,आख्यान
होई भक्तास ज्ञान~विज्ञान
भक्तांनी शौर्याचा महिमा गात रहावा
शिवतत्त्व शुभ,शुभ असे
मल्हारीचे,रूप मनी ठसे
ते भारीच आहे,आख्यान
होई भक्तास ज्ञान~विज्ञान
अंजली जोशी
सुभग सोहळा रंगला उधळल्या हळदीचा,
ओढ दर्शनाची आगा
आतुर भक्त जना,
आशिष दे रे खंडेराया
सकला क्षेम व्हाया
सकला क्षेम व्हाया
ओढ दर्शनाची आगा
आतुर भक्त जना,
आशिष दे रे खंडेराया
सकला क्षेम व्हाया
सकला क्षेम व्हाया
अनिता लुगडे
निळे गगन
निळी धरा
त्यात उधळला
खंडेरायाचा भंडारा
निळी धरा
त्यात उधळला
खंडेरायाचा भंडारा
दीपा ठाणेकर
सोन्याचे अंबर ,
सोनियाचा दिन
सोन्याच्या देवासाठी,
भक्त नाहले सोन्यात
वरी अंबरी झुले ,
निळाईची झालर
अनंग उत्सवाचे,
कैक साक्षी देवगण .
सोनियाचा दिन
सोन्याच्या देवासाठी,
भक्त नाहले सोन्यात
वरी अंबरी झुले ,
निळाईची झालर
अनंग उत्सवाचे,
कैक साक्षी देवगण .
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment