निळमोहोर
चित्र-निळमोहोर
सविता करंजकर
माळरानावरती..
आभाळाच्या छायेत...
लाल मोती अंगभर मिरवत...
उभी काटेसावरी..
देह सावरत..
जणू वसंतऋतूचे स्वागत
करण्या ...
सज्ज जाहली..
चिमणी पाखरांची ही माऊली...
आभाळाच्या छायेत...
लाल मोती अंगभर मिरवत...
उभी काटेसावरी..
देह सावरत..
जणू वसंतऋतूचे स्वागत
करण्या ...
सज्ज जाहली..
चिमणी पाखरांची ही माऊली...
मोक्षदा सुधांशु नूलकर
पिवळ्या हिरव्या माळरानावरती
उभी ऐकटी ती लाल परी
ऊन्हाचा तो चटका झेलत
हसत राहिली मनोमनी----
उभी ऐकटी ती लाल परी
ऊन्हाचा तो चटका झेलत
हसत राहिली मनोमनी----
स्वच्छ अशा त्या नभाखाली
उभा असा तो कोण मोर
जरा जवळ जाता गवसले हा तर
आपला निलमोहोर
उभा असा तो कोण मोर
जरा जवळ जाता गवसले हा तर
आपला निलमोहोर
डॉ.तृप्ती लोणकर
वसंतान मारला धक्का
लाजून लाल झाली अक्का
वसंताचीच पडताभूल
गालावर फुले लाल फूल
लाजून लाल झाली अक्का
वसंताचीच पडताभूल
गालावर फुले लाल फूल
वृषाली गोखले
अद्भुत पळस देखोनि मनोहारी,
तीनच पाने,निसर्ग चमत्कारी,
शेंदरी,मखमली फुल हे बहारी,
ऋतुराज उधळीत जाई,रंग हा शेंदरी!
तीनच पाने,निसर्ग चमत्कारी,
शेंदरी,मखमली फुल हे बहारी,
ऋतुराज उधळीत जाई,रंग हा शेंदरी!
सविता करंजकर
जणू भासती मोरपिसे ही
गर्द निळी फुले...
माथ्यावर वरदहस्त
जणू निळे आभाळ खुले....
गर्द निळी फुले...
माथ्यावर वरदहस्त
जणू निळे आभाळ खुले....
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment