सूर्योदय


स्निग्ध सकाळी कोकिळेची भूपाळी...
आली कानी पाहून सूर्याची  लाली.....
जणू  नीलनभाने गळा
मोत्यांची माळ घातली...
  -  सविता कारंजकर

धुक्यातून वाट काढीत उगवला सूर्य
पिवळी शाल पांघरून...
सकाळचा गारवा किती कोवळा
सकाळ झाली म्हणे उठा पलंगावरून...
कल्पना राठोड/ भोजणे

तुझी नक्षत्रे
ओंजळीत पकडण्याचा इतका छंद
की अलगद कवेत घेत गेले
तुझ्या रात्रीचा प्रत्येक प्रहर,
त्यातील कळ्यांचा ज्वर ,
तो फुलताना , ओसरताना
हरवत गेले तुझ्या चंद्राच्या
आभूषणांना....
पहाटेचा वारा ओसरत गेला अन् निखळू लागली
हातातील नक्षत्रं..
अंधूक होत गेलं
अंधारातील शामल मोरपीस...
उजळू लागलं भासमय आकाश
आणि नक्षत्रात व्यापून राहिलेली मी स्थिरावले कालिंदीसारखी..
पण..पण....
माझ्या अंगणी झालेली पहाट,
दारी पडलेला प्राजक्ताचा सडा ,
तूच लावलेली तुळस ,
त्यांचं बहरणं,
त्याचा गंध मनात दरवळणं..
राहूनच गेलं...
आणि हाती राहिली
ओघळताना जपलेली
तुझी तुटपुंजी नक्षत्रं..
प्रा. दीपा ठाणेकर

शांत,गडद, काळोखी रजनी, प्रहर सरला ,प्रभा फाकली,
सोनेरी ती उषा लाजली,
तरुवेलीं वर, चराचरावर
चैतन्याची अनुभूती आली
अनुजा

उषा:काळी त्या क्षितीजावर
शांत असा तो दिनकर ऊगवला
उठा उठा हो जन गुंजन करीत
तो विहंग गेला
मोक्षदा

ती माळावरती वेडी बाभळ
वाट कोणाची बघते..
काट्यांमधे जन्म घेते अन
वेलींचा शृंगार करते...
सोजर मस्के
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र