पेटलेली चूल
चित्र-पेटलेली चूल
सविता करंजकर
पहाटेच्या पहिल्या प्रहरापासून सुरू होतो दिवस माझा ..
तीळ तीळ तुटतो जीव
चुडाभरल्या हातांसह देह राबत असतो माझा......
तीळ तीळ तुटतो जीव
चुडाभरल्या हातांसह देह राबत असतो माझा......
इच्छा आकांक्षाचं माझ्या
केलं मी आजवर जळण..
भावभावनांच्या करून समीधा
आयुष्याचं आजवर मी केलं सरण...
केलं मी आजवर जळण..
भावभावनांच्या करून समीधा
आयुष्याचं आजवर मी केलं सरण...
पण आज...
माझं स्त्रीत्व आज नाही राहिलं परावलंबी..
मीच दुर्गा ,मीच सरस्वती मीच बनलेय काली...
अर्थहीन नाही मी आता अबला..
एक संपूर्ण शाश्वत वर्चस्व
म्हणूनच आजची मी नारी सबला...
मीच दुर्गा ,मीच सरस्वती मीच बनलेय काली...
अर्थहीन नाही मी आता अबला..
एक संपूर्ण शाश्वत वर्चस्व
म्हणूनच आजची मी नारी सबला...
वृषाली गोखले
चूल पेटली,तरतरी आली,थंडीत तिला ऊब मिळाली!
चुलीवर तिने चहा घेतला
मुकाट्याने कामाला लागली!
मुकाट्याने कामाला लागली!
चहा घेतला,न्याहारी केली,लाकूडफाटा आणायला चालली!
पदर सावरून कामाला घरधनीण सज्ज झाली!
कामे करण्या दिवसाची,शेताकडे चालली!
सौ.चंदना कैलास उतेकर
माझी माऊली
उरी अभिमान दाटे
मज माझ्या माऊलीचा ||धृ||
उरी अभिमान दाटे
मज माझ्या माऊलीचा ||धृ||
राम प्रहरी तिने जाते कष्टाने ओढीले
पिलापिखरांच्यासाठी तिने दळण कांडीले
कुंकवाचा टिळा तिने अंदाजाने गोल केला
कधी चेहरा ना तिने आरशातही पाहिला
उरी हुंदका दाटला लिहीता पाढा हा कथेचा..१
पिलापिखरांच्यासाठी तिने दळण कांडीले
कुंकवाचा टिळा तिने अंदाजाने गोल केला
कधी चेहरा ना तिने आरशातही पाहिला
उरी हुंदका दाटला लिहीता पाढा हा कथेचा..१
पहाटेच्या पारी तिने चूल पेटवली
भारी जड कवलांची पहा तिने उचलली
कवलांच्या वजनाने तिचा चेहरा दबला
झपाझप चाले बघा जाई एकली रानाला
एकटीने उचलला हा भार संसाराचा...२
भारी जड कवलांची पहा तिने उचलली
कवलांच्या वजनाने तिचा चेहरा दबला
झपाझप चाले बघा जाई एकली रानाला
एकटीने उचलला हा भार संसाराचा...२
शिळा भाकरीचा तुकडा फडक्यात गुंडाळला
ताज्या भाकर्यांचा गठ्ठा लेकरांना राखीयला
रापलेला चेहरा तिचा भविष्याच्या भाकरीला
उपाशीपोटी तिचाविळा काळ्यामातीतचालला
ना खंत मनी कसली हसे चेहरा कारूण्याचा.३
ताज्या भाकर्यांचा गठ्ठा लेकरांना राखीयला
रापलेला चेहरा तिचा भविष्याच्या भाकरीला
उपाशीपोटी तिचाविळा काळ्यामातीतचालला
ना खंत मनी कसली हसे चेहरा कारूण्याचा.३
शाळेला ना कधी गेली ना कधी अंक गिरवले
आकडेमोडीची हुशारी जीवनाने शिकवली
व्यवस्थापनाचे धडे आम्ही घरीच गिरविले
माऊलीच्या चेहर्याने मज खूप काही शिकवले
उरी ठेवला जपून ठेवामेहनतीचा,संस्कारांचा४
आकडेमोडीची हुशारी जीवनाने शिकवली
व्यवस्थापनाचे धडे आम्ही घरीच गिरविले
माऊलीच्या चेहर्याने मज खूप काही शिकवले
उरी ठेवला जपून ठेवामेहनतीचा,संस्कारांचा४
आज घर तिचे सजले नातवंडांनी फुलले
मुलगा-मुलगी हो समान असे तिने वाढवले
चार चाकी वाहनांनी तिचे अंगण सजले
हिमतीने लेकरांना सरकारी नोकर बनवले
झाले कष्टाचे हो चिज काळ शांत जगण्याचा५
मुलगा-मुलगी हो समान असे तिने वाढवले
चार चाकी वाहनांनी तिचे अंगण सजले
हिमतीने लेकरांना सरकारी नोकर बनवले
झाले कष्टाचे हो चिज काळ शांत जगण्याचा५
नाव तिचे 'शांताबाई'तिच्या कामात चपळाई
नातवंडांच्या दाण्यापायी शेता राबण्यास जाई
स्वतः जाई ती शेतात ना कोणा जाऊ देई
उन्हातान्हात आजही खडे काढण्यास जाई
डोळे आसवे गाळती असा लेखाजोखा सर्वस्वाचा.....६
नातवंडांच्या दाण्यापायी शेता राबण्यास जाई
स्वतः जाई ती शेतात ना कोणा जाऊ देई
उन्हातान्हात आजही खडे काढण्यास जाई
डोळे आसवे गाळती असा लेखाजोखा सर्वस्वाचा.....६
अनिता लुगडे
आयुष्याच्या भट्टीत
तिच्या कष्टाच्या समिधा
सुरकुतल्या हातात
सुखी संसाराचा वायदा
तिच्या कष्टाच्या समिधा
सुरकुतल्या हातात
सुखी संसाराचा वायदा
स्मिता परदेशी
जाळ पेटतो पेटतो
जिव्हा लवलवीत जातो
माझ्या नाजूक ओठांची
मला किमया दावितो
हात राधतो राधतो
वास आसमंती जातो
माझ्या ग घरादाराला
चव तृप्तीची तो देतो
एक फुंकर ओठीची
अग्नी प्रदीप्त करिते
एक कृती या हाताची
अवघ्या घराला पोशिते
जाण ताकद गे माये
तुझ्या अवघ्या या देहाची
दावी किमया जगाला
हळव्या प्रेमळ मनाची
दीपा ठाणेकर
जिव्हा लवलवीत जातो
माझ्या नाजूक ओठांची
मला किमया दावितो
हात राधतो राधतो
वास आसमंती जातो
माझ्या ग घरादाराला
चव तृप्तीची तो देतो
एक फुंकर ओठीची
अग्नी प्रदीप्त करिते
एक कृती या हाताची
अवघ्या घराला पोशिते
जाण ताकद गे माये
तुझ्या अवघ्या या देहाची
दावी किमया जगाला
हळव्या प्रेमळ मनाची
दीपा ठाणेकर
गर्द रानाचा चुडा मनगटी ,
सरपणासवे ज्वाळा पेटती,
केवड्याची नक्षी ओल्या हाती,
संसाराचे सनईसुर ओठी येती,
प्रेमळ क्षणांसाठी भाव ओथंबती,
मनातील स्वप्नांचे गावतील मोती..
सरपणासवे ज्वाळा पेटती,
केवड्याची नक्षी ओल्या हाती,
संसाराचे सनईसुर ओठी येती,
प्रेमळ क्षणांसाठी भाव ओथंबती,
मनातील स्वप्नांचे गावतील मोती..
दीपा ठाणेकर
माती मातीचा ग कण
गाई संसाराची धून /
हाती मेंदीचा चढे रंग
दाटे तिचा संग //
गाई संसाराची धून /
हाती मेंदीचा चढे रंग
दाटे तिचा संग //
जावे बाईच्या ग वंशा
कळू लागतो ग दंश /
संसारात मायेची पखरण
देई घराला घरपण //
कळू लागतो ग दंश /
संसारात मायेची पखरण
देई घराला घरपण //
उतू नये मातू नये कधी
घरोघरी बाईला शिकवण / मनी ठेऊ नये ग अंतर
हेच आलं शहाणपण //
घरोघरी बाईला शिकवण / मनी ठेऊ नये ग अंतर
हेच आलं शहाणपण //
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment