कमळातील पात्रात पाणी पिणारा भारद्वाज
चित्र- अंगणात कमळाच्या पात्रातील पाणी पिणारा भारद्वाज
वृषाली गोखले
झाला शुभशकुन सुप्रभाती!
भारद्वाज हा शुभसंकेती!
अहा,कसा तो शुभयोग साधती!
कमलपात्री सुखेनैव जल प्राशिती!
भारद्वाज हा शुभसंकेती!
अहा,कसा तो शुभयोग साधती!
कमलपात्री सुखेनैव जल प्राशिती!
सविता करंजकर
आला आला तो पहा
अंगणी माझ्या भारद्वाज..
सकाळच्या प्रहरी तयाने
दिधले दर्शन मजला आज..
अंगणी माझ्या भारद्वाज..
सकाळच्या प्रहरी तयाने
दिधले दर्शन मजला आज..
घेऊनी आला सोबतीला
जणू काही सुखद बात..
आनंदाने केली झणी
माझिया दुःखावरी मात..
जणू काही सुखद बात..
आनंदाने केली झणी
माझिया दुःखावरी मात..
तव आगमनाने बा खगा
मनमोर थुईथुई नाचला
पहा मोगरा फुलला
अन् पारिजातही खुलला.....
मनमोर थुईथुई नाचला
पहा मोगरा फुलला
अन् पारिजातही खुलला.....
वृषाली गोखले
दृश्य हे अति सुखद असे
दर्शन शुभ हे मनी ठसे
हे सत्य असे की मनी वसे
संशय मुळी हा मनी नसे
दर्शन शुभ हे मनी ठसे
हे सत्य असे की मनी वसे
संशय मुळी हा मनी नसे
नीता धोडापकर
नल- दमयंतीचा दूत असे तो शुभ्र हंसराज
शुभवार्ता ही मजला देई भारद्वाज आज!
प्रेमपत्र ते हंस आणी, घेई मोत्याचा चारा
भारद्वाज हा देई मात्र शुभवार्ता साऱ्या!
थंडगार ते पाणी पिऊनी तृप्त होई स्वारी,
मनाजोगता पाहुणा येईल आज तुझिया दारी!
शुभवार्ता ही मजला देई भारद्वाज आज!
प्रेमपत्र ते हंस आणी, घेई मोत्याचा चारा
भारद्वाज हा देई मात्र शुभवार्ता साऱ्या!
थंडगार ते पाणी पिऊनी तृप्त होई स्वारी,
मनाजोगता पाहुणा येईल आज तुझिया दारी!
उल्का भातखंडे
भारद्वाज
भारद्वाज हा पक्षी पूर्ण देशात आढळतो असे वैज्ञानिक माहिती आहे. किती सुंदर आहे नाव! पण द्वाज ऐवजी द्बार असतं तर अधिक छान वाटल असत.कारण हा पक्षी कोकणात,पाँडिचरी अशा सिमावर्ती प्रदेशात आढळतो.
तो घंगाळ्यातील कमळाच्या पानाकडे बघतो आहे.तसेच पाण्यातही डोकावत आहे.त्यामुळे रक्षक असल्यासारखा तो सृष्टी आणि पाण्यात प्रतिंबिंबाकडे बघून ,काठावर बसून जणू असे सांगतो आहे कि ह्या गोल पृथ्वीच्या मध्ये माझा भारत देश आहे आणि त्याच्या व्दारावर बसून रक्षण करत आहे.

सौ.चंदना कैलास उतेकर
स्वप्नवत भारद्वाज अंगणात आज आला
कमलपर्णांची नक्षी पाहण्या आज आला
जलदर्पणात स्वतःस न्याहाळण्यास आला
जलसखीचे ह्रदय चोरण्यास आज आला
कमलपर्णांची नक्षी पाहण्या आज आला
जलदर्पणात स्वतःस न्याहाळण्यास आला
जलसखीचे ह्रदय चोरण्यास आज आला
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment