पाचगणी पसरणी घाटातील चित्र

चित्र- पाचगणीच्या पसरणी घाट परिसरात काढलेलं  छायाचित्र
वृषाली गोखले
परसरणीच्या भैरी देवा
तुझ्या घाटात निसर्ग मेळा
पळस हा फुलला देवा
मनी उपजला भाव भोळा
बहरला पळस शेंदरी
किमया ही अद्भुत न्यारी
मागे भव्य निळे आकाश
रेखीव फुलला सूंदर पलाश
भरे स्वानंदे हृदयाकाश
ऋतुसंगे जुळले अतूट पाश
सविता गणेश
थेंबा थेंबात रे देवा
तुझाच श्वास
कणा कणात मातीच्या
तुझाच रे भास
नीलनभाची सावली
हिरव्या पानांची दुलई
माळावरी तु एकटा
तरी रंगलास शेंदुरी
ओढ लागते मनाला
तुझ्या कुशीत शिरावे
शिणलेल्या या जीवाला
तुझ्या रंगाने भरावे
अंजली जोशी
सृष्टी ची सुंदरता
रंगरुप लेवून आली
दृष्टी सुखाचा सोहळा
मनात रेखून गेली
निळ्या आभाळी लाल फुलांचा बहर
देवाजीच्या जादुगिरीला
जोडूया हे कर
स्मिता परदेशी-करंजकर
निळ्या आभाळी लाल केशरी
पळस फुलांचे तुरे उभारी
हिरवी पिवळी सृष्टी ही तर
जणू तेजाचे वस्त्र सावरी
रंगांची ही मुक्त उधळण
इंद्रधनू जणू मोद तुषारी....
   
अनिता लुगडे
नीलनभाच्या पटलावरती
चित्र कोण हे रेखितो?
रंग केशरी हिरवे पिवळे
  नक्षी सुंदर काढितो

कल्पना देशमुख
निळ्या आसमंतात फुलला पळस
वसंत ऋतूला आली बहार
रानोरानी शेंदरी पिवळ्या रंगाची उधळण
सृष्टीही सजली लेऊनी सोळा श्रृंगार
दीपा ठाणेकर
हिरव्या पिवळ्या शेतावरी ,
जडली जवाहिरे सोनेरी ,
जडली जवाहिरे सोनेरी ,
पळसपर्णांची गर्द लाली,
पळसपर्णांची गर्द लाली,
नीलांबरी ही नक्षी झाली .
नीलांबरी ही नक्षी झाली,
लाज लजवंतीच्या गाली.
लाज लजवंतीच्या गाली,
पारवा कुणी फेरी घाली..
पारवा कुणी फेरी घाली,
लजवंतीशी भेट झाली.
लजवंतीशी भेट झाली.
सारी सृष्टी तृप्त झाली....
दीपा ठाणेकर
निळ्याशार जलाशयाशी
बर्फाच्या अगणित राशी,
रविकिरणे तयावर पडती,
सोनेरी झळकल्या जलराशी.
पाहून मेघ आकर्षिले,
घेऊनी जलधारा आले,
पुलकित झाला मातीचा कण,
सुगंधित आज तन न् मन..
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र