गॅलरीतील फुलांवर फुलपाखरू

चित्र-गॅलरीतील फुलांवर फुलपाखरू येऊन बसले-सौ.ऋतुजा गवस
दीप्ती पुजारी
माझ्या सज्यात एक झेंडूचं रोपटं
शेंदरी फुलं जणू हसरं बाळ नकटं
एका सकाळी अवचित आले
सुरेख फुलपाखरू लाडेगोडे
फुल त्याच्यावर घाली मायची पाखर
जशी आईनं वाढावी दुधात साखर
बघून मनी आठवण दाटली
मनी अशीच खेळायची भातुकली
माझ्या छोट्या फुलाची झालीय आई
तिच्या सोनूलीला खेळ मांडायची घाई
वृषाली गोखले
झाले विराजमान ते गोड पाखरू!
दर्शन घेताच त्याचे चिंता लागल्या सरू!
शेंदरी फूल ते अहा,चित्तास चैतन्य देई!
सकल जनास,आनंद~मोद देई!
पंख पांढरे~काळे~शेंदरी!
शोभती किती ते,मध चाखता खुशीत ही स्वारी!
वृषाली गोखले
मधूगंध सेविते छानसे फुलपाखरू!
पाखराचे अन्न हे,निसर्ग समृद्ध करू!
उडे,बागडे,स्वच्छंद हे मजेने!
पाखराचे सुख हे जपुया त्वरेने!
सविता करंजकर
इवलासा जीव तुझा
रंगसंगती सुरेख..
बसलास तू पानांवरी
पसरूनी पंख...
पान खुलले हसले
मग हळूच पुसले..
रंग तू उधळले..
परागकण तू लुटले..
सांग  एवढे करून
तुला काय गवसले?
जीव गालात हसला..
मनोमनी सुखावला..
म्हणे देत देत घेणा-याच्या
मोदातला मोद
मी  लुटला....
वृषाली गोखले
बालपणीचे सूख ते आठवे आजही,
रंगीत पाखरे ती आठवती आजही,
किती,किती रंग ते भुलविती आपणाला!
ठेवा हा जतन करूया अमोल सृष्टीतला!
स्मिता परदेशी
मनाचं फुलपाखरू
  डोलतय बागडतय
सुखाच्या फुलांवर कधी
   दुःखाच्या पानांवर
पाहणार्या डोळ्याना मात्र
आनंदच ते लुटतय
पंखांवरचे रंग
मनामनात वाटतय....
     
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments

Popular posts from this blog

निष्पर्ण झाड

मधमाशी पोळे

दवबिंदू आणि निसर्गचित्र