पिवळे रानफुल
चित्र-पिवळे रानफुल
वृषाली गोखले
असे रानफूल,जे आनंद देते
सुगंधी फुलालाही हरवून जाते
सुगंधी फुलालाही हरवून जाते
म्हणे,ते मनाशी, पहा माझे सौन्दर्य ते आगळे!
नसूनी सुगंध,परि सकळजन आनंदले!
नसूनी सुगंध,परि सकळजन आनंदले!
वृषाली गोखले
ऐटीत तो बसला सुखाने हरित रंगी नाकतोडा !
मौजेने ऐसा बसे की
चालवी तो पीत घोडा
मौजेने ऐसा बसे की
चालवी तो पीत घोडा
आपटे अस्मिता
निसर्गाची किमया न्ह्यारी,
विविध रंगात दिसते
हिरव्या कळीतून,
पिवळे फुल बहरते
रानकिड्यांची ऐट भारी,
फुलासंगे वाऱ्यावरी डोलते
विविध रंगात दिसते
हिरव्या कळीतून,
पिवळे फुल बहरते
रानकिड्यांची ऐट भारी,
फुलासंगे वाऱ्यावरी डोलते
सविता करंजकर
पिवळे पिवळे एक सानुले
फूल नाजूकसे पहा ते फुलले..
मन माझे मोहरून गेले..
रान पहा कसे सुगंधी झाले....
फूल नाजूकसे पहा ते फुलले..
मन माझे मोहरून गेले..
रान पहा कसे सुगंधी झाले....
हसूनी फुलराणीस मी पुसले..
सांग तुला इथे कुणी गं धाडिले..
गोड लाजूनी गिरकी घेऊन
फूल झणी ते वदते झाले...
सांग तुला इथे कुणी गं धाडिले..
गोड लाजूनी गिरकी घेऊन
फूल झणी ते वदते झाले...
कवी मनाला मोह पाडण्या
सृष्टीच्या निर्मिकाने मज इथे धाडले....
सृष्टीच्या निर्मिकाने मज इथे धाडले....
मन माझे मोहरून गेले..
रान पहा कसे सुगंधी झाले...
रान पहा कसे सुगंधी झाले...
अंजली जोशी
प्रसन्न पिवळे फूल उमलले
चरचरा आनन्दे भरले
कोण लोभले त्या तेजावर
विसरुनि आपुले हिरवे रुपडे...
चरचरा आनन्दे भरले
कोण लोभले त्या तेजावर
विसरुनि आपुले हिरवे रुपडे...
सुचेता /मोक्षदा
हिरवा जणू शेला नेसला अवंतिकेने त्यावर नक्षी चितारली पिवळ्या रंगाने
कोण हा वेध घेतो त्या नक्षीचा
अरे हा तर नमस्कार किडा...
कोण हा वेध घेतो त्या नक्षीचा
अरे हा तर नमस्कार किडा...
सौ.चंदना कैलास उतेकर
उठा उठा हो पहाट झाली
पहा कोणाची आली स्वारी?
रवीचा हरित दूत आला
वाजवित तेजाची *सोनतुतारी*
पहा कोणाची आली स्वारी?
रवीचा हरित दूत आला
वाजवित तेजाची *सोनतुतारी*
दीपा ठाणेकर
सभोवताली येथे अनंत पुष्पे ,
परि भाळले मन यावरि इतुके,
साजिरे सौंदर्य पितांबरी देखणे,
जणू वाग्डनिश्चया हळद ल्यालेले,
मिलनोत्सुक मी ही गड्यांनो,
साक्षीदार व्हा तुम्ही या क्षणांनो
परि भाळले मन यावरि इतुके,
साजिरे सौंदर्य पितांबरी देखणे,
जणू वाग्डनिश्चया हळद ल्यालेले,
मिलनोत्सुक मी ही गड्यांनो,
साक्षीदार व्हा तुम्ही या क्षणांनो
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment