नारळातील कोंब
चित्र-नारळातील कोंब
डॉ तृप्ती लोणकर
प्राजक्ताचा सडा
स्वर्गाच्या ग अंगणात
सडापडे प्राजक्ताचा।
गंध इंद्रदरबारी
फायदा हा रूक्मिणीचा ॥
स्वर्गाच्या ग अंगणात
सडापडे प्राजक्ताचा।
गंध इंद्रदरबारी
फायदा हा रूक्मिणीचा ॥
गळा प्राजक्ताचा हार
घालती ग या अप्सरा।
ती S रूळे अंगा खांद्यावर
मिरवीत त्याचा तोरा।
घालती ग या अप्सरा।
ती S रूळे अंगा खांद्यावर
मिरवीत त्याचा तोरा।
नको नको माणसा
तुझा उष्ण हात लाऊ।
आमचे सौंदर्य स्वर्गीय
कोमेजून आम्ही जाऊ॥
वृषाली गोखले
तुझा उष्ण हात लाऊ।
आमचे सौंदर्य स्वर्गीय
कोमेजून आम्ही जाऊ॥
वृषाली गोखले
मुळी ना उमजे हा चमत्कार!
कोण तो,सृष्टीचा शिल्पकार!
गोड तुझी करणी देवा
नारळात दिला निसर्ग मेवा!
कोण तो,सृष्टीचा शिल्पकार!
गोड तुझी करणी देवा
नारळात दिला निसर्ग मेवा!
कल्पना देशमुख
फळात फळ श्रीफळ
त्यात पांढरा शुभ्रकोंब पाहुनी
स्वाद घ्यावा मधुर मधुर
ग्रीष्मात रस प्राषुनी....||
त्यात पांढरा शुभ्रकोंब पाहुनी
स्वाद घ्यावा मधुर मधुर
ग्रीष्मात रस प्राषुनी....||
डॉ तृप्ती लोणकर
देवा तुझी रे करणी
बंद नारळात पाणी
कोंब उपजे प्रेमाचा
जणू माऊलीच्या मनी
अंजली जोशी
बंद नारळात पाणी
कोंब उपजे प्रेमाचा
जणू माऊलीच्या मनी
अंजली जोशी
पक्व फळाच्या उरी,
कोंब नवजीवाचा तरारे,
देवाशिष तो चिरंतनाचा
धरेसाठी आसुसे.
कोंब नवजीवाचा तरारे,
देवाशिष तो चिरंतनाचा
धरेसाठी आसुसे.
नयना घडशी
कल्पतरूचे अम्रूत फल मी!
गोडी माझिया न्यारी,
नाविन्याची आस अशी ही ,
अंकुरे माझ्या गर्भी.
गोडी माझिया न्यारी,
नाविन्याची आस अशी ही ,
अंकुरे माझ्या गर्भी.
स्मिता परदेशी
कठोर कवच ते पित्यासम असे
मधुर ममता आत वसे
उदरी बीज हे कल्पतरूचे
निर्माणाचे स्वप्न दिसे.
मधुर ममता आत वसे
उदरी बीज हे कल्पतरूचे
निर्माणाचे स्वप्न दिसे.
सविता कारंजकर
कोशातला गोळा..
क्षीर रंगातला
कोंब जणू गर्भातला....
क्षीर रंगातला
कोंब जणू गर्भातला....
चमत्कार निसर्गाचा
माऊलींच्या मनातला
झरा अलौकिक वात्सल्याचा....
माऊलींच्या मनातला
झरा अलौकिक वात्सल्याचा....
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment