निष्पर्ण झाड
चित्र-निष्पर्ण झाड
प्रीती कामत तेलंग
त्यजूनिया पर्णराशी,
ना त्याची खंत उराशी
फलद्रुप होता जन्म सार्थकी,
उणे न काही मम भाग्यासी।
ना त्याची खंत उराशी
फलद्रुप होता जन्म सार्थकी,
उणे न काही मम भाग्यासी।
प्रो. भारती प्रभू
पानगळच ती...
आशा निराशेच्या झोक्यासारखी
कधी उधळुन संपलेली
कधी बहरण्या आसुसलेली.
आशा निराशेच्या झोक्यासारखी
कधी उधळुन संपलेली
कधी बहरण्या आसुसलेली.
अंजली जोशी
निष्पर्ण देह जरी झाला
कृतार्थ जन्म हा माझा
जीव एकच जरी हा माझा
शतबीज सृजने बरसला
कृतार्थ जन्म हा माझा
जीव एकच जरी हा माझा
शतबीज सृजने बरसला
वृषाली गोखले
पानगळ होई,परि सुप्त बीजे,
बदलला ऋतू फिरुनी
वृक्ष सुपर्णे पुन्हा विराजे
मोद बहरे,सृष्टीत बहरुनी
बदलला ऋतू फिरुनी
वृक्ष सुपर्णे पुन्हा विराजे
मोद बहरे,सृष्टीत बहरुनी
स्मिता परदेशी
सृजनशील सख्या .....
त्यांच्या कल्पकतेचा दरवळ
उत्साहाची बीजे स्फुरती
नैराश्याची आपसुकच पानगळ
सविता करंजकर
त्यांच्या कल्पकतेचा दरवळ
उत्साहाची बीजे स्फुरती
नैराश्याची आपसुकच पानगळ
सविता करंजकर
पर्णहीन तरी लक्ष करांनी तू देशी आम्हां फळे..
किमया त्या निर्मिकराची
कोणासही ना कळे....
कोणासही ना कळे....
थंडगार तू देशी छाया
परी जाळशी तू तव काया
परी जाळशी तू तव काया
देह झिजवूनिया..
जगावरी तू करशी रे माया...
जगावरी तू करशी रे माया...
सौ.चंदना कैलास उतेकर
आवरला मी सारा
हरितपर्णांचा पसारा
वसंताच्या आगमनास
आतूर निसर्ग सारा
हरितपर्णांचा पसारा
वसंताच्या आगमनास
आतूर निसर्ग सारा
अंजली जोशी
तहान
तहान
सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा.
संतप्त सूर्य आता, ओकेल तप्त ज्वाळा.
संतप्त सूर्य आता, ओकेल तप्त ज्वाळा.
पक्षी दिशा दिशांना, फिरतील ते थव्यांनी.
सुकतील कंठ त्यांचे, मग शोधतील पाणी.
सुकतील कंठ त्यांचे, मग शोधतील पाणी.
सुकली तळी जळाची, पाणी पिण्यास नाही.
त्या सानुल्या जीवांची, होईल लाही लाही.
त्या सानुल्या जीवांची, होईल लाही लाही.
त्यांच्या जिवाकरिता, इतकी कराच सेवा.
वाटीत एवढेसे, पाणी भरुन ठेवा..
वाटीत एवढेसे, पाणी भरुन ठेवा..

ही कविता कोणाची?
ReplyDelete